सापडलेली चांदीची पिशवी परत करून टेलरने दाखवला प्रामाणिकपणा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2021 04:17 IST2021-07-19T04:17:03+5:302021-07-19T04:17:03+5:30
पट्टणकोडोली : पट्टणकोडोली (ता. हातकणंगले) येथे सापडलेली दीड किलो चांदीचा माल असलेली पिशवी परत करून येथील एका टेलरने प्रामाणिकपणा ...

सापडलेली चांदीची पिशवी परत करून टेलरने दाखवला प्रामाणिकपणा
पट्टणकोडोली : पट्टणकोडोली (ता. हातकणंगले) येथे सापडलेली दीड किलो चांदीचा माल असलेली पिशवी परत करून येथील एका टेलरने प्रामाणिकपणा दाखवला. हसन सिकंदर हेरवाडे असे या टेलरचे नाव असून, त्यांच्या प्रामाणिकपणाबद्दल गावातून कौतुक होत आहे.
पट्टणकोडोली येथील चांदी व्यावसायिक सचिन पाटील हे आपल्या दुचाकीवरुन चांदी व्यवसायाच्या कामानिमित्त चांदीचा माल पिशवीतून घेऊन जात होते. यावेळी त्यांची पिशवी मराठी शाळेसमोर रस्त्यावरच पडली. मात्र, त्यांना याची कल्पना नव्हती. ही चांदी असलेली पिशवी टेलर हसन हेरवाडे यांना सापडली. त्यांनी पिशवी ताब्यात घेत शोधायला कोणी येते का, याची वाट पाहिली. येथील नवरत्न चौकात ते थांबले होते. यावेळी तासाभराने सचिन पाटील हे भांबावलेल्या स्थितीत पिशवी शोधत होते. हे पाहून हसन हेरवाडे यांनी काय शोधत आहात, असे विचारले. यावेळी त्यांनी आपली चांदीचा माल असलेली पिशवी हरवल्याचे सांगताच हेरवाडे यांनी त्यांना सापडलेली चांदीची पिशवी पाटील यांना परत केली. हेरवाडे यांच्या प्रामाणिकपणाबद्दल त्यांचे गावातून कौतुक होत आहे.