कर आकारणीची माहिती ‘एसएमएस’द्वारे मिळणार
By Admin | Updated: August 26, 2014 23:55 IST2014-08-26T23:49:45+5:302014-08-26T23:55:14+5:30
कुरुंदवाड पालिका सभा : आठ विषयांना मंजुरी

कर आकारणीची माहिती ‘एसएमएस’द्वारे मिळणार
ठाणे : इकोफ्रेंडली गणेशोत्सव ही संकल्पना रुजवणा-या ठाणे महापालिकेने यंदाही यासाठी आपली यंत्रणा सज्ज केली आहे. नागरिकांनी पर्यावरणाभिमुख गणेशोत्सव साजरा करावा तसेच महापालिकेने निर्माण केलेल्या पर्यायी विसर्जन व्यवस्थेचा उपयोग करावा, असे आवाहन महापौर हरिश्चंद्र पाटील आणि आयुक्त असीम गुप्ता यांनी केले आहे. तसेच विसर्जन घाटांवर पाणबुडी पथक, अग्निशमन यंत्रणा, पोलीस बंदोबस्त, सीसीटीव्ही कॅमेरे आणि ५०० प्रशिक्षित स्वयंसेवकांसह वैद्यकीय पथकही सज्ज ठेवण्यात येणार आहेत.
पर्यावरणाभिमुख शहराची संकल्पना प्रत्यक्षात उतरावी, यासाठी महापालिका अनेक उपाययोजना करीत असून गेल्या आठ वर्षांपासून शहरामधील तलावांमध्ये प्रदूषण रोखण्यासाठी पर्यायी विसर्जन व्यवस्था करण्यात येत आहे. गेल्या काही वर्षांत या पर्यायी विसर्जन व्यवस्थेला नागरिकांकडून चांगला प्रतिसाद मिळाला आहे. २०१३ मध्ये ४५ हजार ९३९ गणेशमूर्तींचे विसर्जन पर्यायी विसर्जन व्यवस्थेमध्ये करण्यात आले होते. यापैकी २७ हजार ९३ मूर्तींचे विसर्जन पालिकेने निर्माण केलेल्या पर्यायी विसर्जन व्यवस्थेमध्ये करण्यात आले होते. २०१२ मध्ये ही संख्या १८ हजार ३१५ एवढी होती. (प्रतिनिधी)