तौफिक मुल्लाणी यांना कॉमनवेल्थ युनिव्हर्सिटीकडून ‘डॉक्टरेट’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2021 04:27 IST2021-07-14T04:27:03+5:302021-07-14T04:27:03+5:30

कोल्हापूर : येथील महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस सचिव आणि माजी नगरसेवक तौफिक मुल्लाणी यांना नवी दिल्ली येथील कॉमनवेल्थ ...

Tawfiq Mullani gets 'Doctorate' from Commonwealth University | तौफिक मुल्लाणी यांना कॉमनवेल्थ युनिव्हर्सिटीकडून ‘डॉक्टरेट’

तौफिक मुल्लाणी यांना कॉमनवेल्थ युनिव्हर्सिटीकडून ‘डॉक्टरेट’

कोल्हापूर : येथील महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस सचिव आणि माजी नगरसेवक तौफिक मुल्लाणी यांना नवी दिल्ली येथील कॉमनवेल्थ व्होकेशनल युनिव्हर्सिटीने मानद डॉक्टरेट पदवी प्रदान करून सन्मानित केले आहे.

सामाजिक क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या तौफिक मुल्लाणी यांनी करसल्लागार व्यवसायात गेली वीस वर्षे सेवा दिली आहे. विद्यार्थी शिष्यवृत्ती, गरजूंना मदत कार्य विशेषतः कोरोनाच्या सुरुवातीपासून अन्न, धान्य, सॅनिटायझर वाटप, आदी उपक्रम राबवले. कोरोनाग्रस्त मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात त्यांनी सर्वप्रथम पुढाकार घेत सामाजिक योगदान दिले. त्यांची सन २०१९ मधील अमेरिका अभ्यास दौऱ्यासाठी निवड झाली होती. देशातून निवड झालेले ते काँग्रेसचे एकमेव पदाधिकारी होते. या दौऱ्यामध्ये ‘अमेरिकेतील विविधतेतील एकता’ या विषयावरील त्यांच्या विशेष अभ्यासाचा आणि सामाजिक योगदानाची दखल घेऊन डाॅक्टरेट पदवी जाहीर केली आहे. मुल्लाणी हे कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजचे संचालक असून वेगवेगळ्या राज्यामध्ये त्यांनी पक्षाचे काम केले आहे.

फोटो (१३०७२०२१-कोल-तौफिक मुल्लाणी (कॉमनवेल्थ) : नवी दिल्ली येथे कोल्हापुरातील माजी नगरसेवक तौफिक मुल्लाणी यांना कॉमनवेल्थ व्होकेशनल युनिव्हर्सिटीच्यावतीने मानद डॉक्टरेट पदवी प्रदान करण्यात आली. या वेळी शेजारी प्र-कुलगूरू डाॅ. रिपू रंजन सिन्हा, पॅलेस्टिन दूतावासचे डाॅ. अबेद अबू झाजेर, संचालक राकेश मित्तल, प्रियदर्शी नायक उपस्थित होते.

Web Title: Tawfiq Mullani gets 'Doctorate' from Commonwealth University

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.