तात्यासाहेब कोरे यांच्या स्मृतिपर्वकालाचे कार्यक्रम रद्द

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2020 05:00 IST2020-12-05T05:00:09+5:302020-12-05T05:00:09+5:30

वारणानगर : वारणा परिसराचे भाग्यविधाते सहकारमहर्षी स्व. तात्यासाहेब कोरे यांच्या स्मृतिपर्वकालानिमित होणारे आंतरराष्ट्रीय कुस्ती मैदान, शेतकऱ्यांसाठीचे कृषिप्रदर्शन, सद‌्भावना दौड, ...

Tatyasaheb Kore's memorial program canceled | तात्यासाहेब कोरे यांच्या स्मृतिपर्वकालाचे कार्यक्रम रद्द

तात्यासाहेब कोरे यांच्या स्मृतिपर्वकालाचे कार्यक्रम रद्द

वारणानगर : वारणा परिसराचे भाग्यविधाते सहकारमहर्षी स्व. तात्यासाहेब कोरे यांच्या स्मृतिपर्वकालानिमित होणारे आंतरराष्ट्रीय कुस्ती मैदान, शेतकऱ्यांसाठीचे कृषिप्रदर्शन, सद‌्भावना दौड, क्रीडा स्पर्धा यांसारखे सर्व कार्यक्रम कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रद्द केले असल्याची माहिती वारणा उद्योग व शिक्षण समूहाचे प्रमुख आमदार डॉ. विनय कोरे यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत दिली.

तात्यासाहेब कोरे यांच्या स्मरणार्थ गेली २५ वर्षे धनत्रयोदशी ते १३ डिसेंबर हा कालावधी स्मृतिपर्वकाल म्हणून साजरा केला जातो. या पर्वकालामध्ये विविध क्रीडा स्पर्धा, आंतरराष्ट्रीय कुस्ती मैदान, कृषिप्रदर्शन, रथोत्सव असे कार्यक्रम आयोजित केले जातात. सध्या संपूर्ण जग कोरोना संकटाचा सामना करीत आहे. सध्या महामारीचे आणखी संकट उभे राहत आहे. याचे गांभीर्य ओळखून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर वारणेत होणारे सर्व कार्यक्रम रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. परंपरा खंडित होऊ नये म्हणून वारणा समूहातील फक्त संस्थांतूनच स्मृतिज्योत प्रज्वलित करून तात्यासाहेब यांच्या समाधिस्थळावर परंपरेप्रमाणे नेण्यात येणार आहे. या ठिकाणी वारणा भगिनी मंडळाच्या भजनी मंडळाचा भजनांचा कार्यक्रम होणार आहे.

वारणा परिसरातील गावागावांतील कार्यकर्त्यांनी वारणानगरला न येता आपापल्या गावांतीलच ग्रामपंचायत व विविध संस्थांमध्ये तात्यासाहेब कोरे यांच्या प्रतिमेचे पूजन करावे, असे आवाहन डॉ. विनय कोरे यांनी केले आहे.

यावेळी सुराज्य फौंडेशनचे अध्यक्ष एन. एच. पाटील, वारणा दूध संघाचे सचिव के. एम. वाले, वारणा बझारचे सरव्यवस्थापक शरद महाजन, फौंडेशनचे संचालक प्रा. जीवनकुमार शिंदे यांच्यासह स्मृतिपर्वकाल समितीचे सदस्य उपस्थित होते.

. स्व. तात्यासाहेब कोरे यांचा फोटो

Web Title: Tatyasaheb Kore's memorial program canceled