पाश्चिमात्य पदार्थांची लज्जत
By Admin | Updated: August 22, 2014 22:29 IST2014-08-22T22:14:00+5:302014-08-22T22:29:21+5:30
लोकमत सखी मंच : थाई, मेक्सिकन, फ्रेंच पदार्थांची प्रात्यक्षिके सादर

पाश्चिमात्य पदार्थांची लज्जत
कोल्हापूर : भारतीय संस्कृतीत जेवणाला यज्ञाची उपमा दिली आहे, तर प्रेमाची वाट पोटातून जाते असे म्हणतात. आपल्या कुटुंबाला लज्जतदार जेवणाचा आस्वाद देण्यासाठी प्रत्येक गृहिणी प्रयत्नशील असते. म्हणूनच सुगरणीच्या स्वयंपाक घराची चौकट अधिक व्यापक करण्यासाठी ‘लोकमत सखी मंच’च्यावतीने खास सखी सदस्यांसाठी आज, शुक्रवारी थाई, मेक्सिकन, फ्रेंच या पाश्चात्त्य पद्धतीच्या पदार्थांच्या प्रात्यक्षिकांचे आयोजन करण्यात आले होते.
हॉटेल केट्रीमध्ये आयोजित या कार्यक्रमास हॉटेलच्या संचालिका कविता कडेकर यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर गोड आणि तिखट मोदक बनविण्याच्या स्पर्धेचेही आयोजन करण्यात आले होते.
यावेळी हॉटेल केट्रीचे शेफ कृष्णा जाधव, सुनील गोसावी, हरी गावडे यांनी सखी सदस्यांना व्हेट आला किंग, व्हेज पुलाव, मोमोज, थाई करी यासह थाई, मेक्सिकन, फ्रेंच पद्धतीच्या पदार्थांचे प्रात्यक्षिक करून दाखविले.
मोदक स्पर्धेतील विजेत्यांना टपर वेअरच्यावतीने बक्षिसे देण्यात आली. सखी मंच संयोजन समितीच्यावतीने कविता कडेकर यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी सखी सदस्या मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. (प्रतिनिधी)
गोड, तिखट मोदक स्पर्धेचा निकाल
गोड मोदक
प्रथम : मृणाल चव्हाण
द्वितीय : नीलम बनछोडे
तृतीय : कल्पिता मंडले
उत्तेजनार्थ : आशादेवी मोहिते
तिखट मोदक
प्रथम : अमिता पाटील
द्वितीय : प्रफुल्लता बिडकर
तृतीय : सुरेखा भोसले
उत्तेजनार्थ : संगीता झेंडे
सुरेख नियोजन
मुख्य प्रायोजक हॉटेल केट्रीच्यावतीने या कार्यक्रमाचे सुरेख संयोजन करण्यात आले होते. प्रात्यक्षिक दाखविणारे शेफ पदार्थ बनविण्याची पद्धत अधिक सुलभपणे दाखवित होते. शिवाय सखींच्या शंकांचे निरसन करीत होते. या पाश्चात्त्य पदार्थांबरोबरच सखी सदस्यांनी हॉटेलच्या खास वैशिष्ट्यपूर्ण पदार्थांचा आस्वाद घेतला. सरव्यवस्थापक याज्ञवाल्क गायकवाड, आनंद भाकरे, बालू सुपल यांनी संयोजन केले.