दहा वाहनचालकांवर तहसीलदारांची कारवाई
By Admin | Updated: January 13, 2016 01:13 IST2016-01-13T00:55:00+5:302016-01-13T01:13:30+5:30
४७,५०० रुपयांचा दंड : क्षमतेपेक्षा जास्त चिरे, वाळूची वाहतूक

दहा वाहनचालकांवर तहसीलदारांची कारवाई
आजरा : आजरा तालुक्याच्या हद्दीत कोकणसह कर्नाटक येथून क्षमतेपेक्षा जादा वाळू व चिऱ्यांची वाहतूक केल्याप्रकरणी आजरा तहसीलदार श्रीमती शिल्पा ठोकडे यांनी कारवाईचा बडगा उगारत तीन दिवसांत दहा वाहनचालकांना ४७,५०० रुपयांचा दंड ठोठावला आहे.आजरा तालुक्यामध्ये शासकीय सुट्यांचा फायदा उठवत सिंधुदुर्ग जिल्ह्यातून व कर्नाटकातून मोठ्या प्रमाणावर वाळू व चिऱ्यांची वाहतूक होत असते. तहसीलदार ठोकडे यांनी पाळत ठेवून शनिवारी (दि. ९), रविवारी (दि. १०) व सोमवारी (दि. ११) अचानक संशयास्पद वाळू व चिरे वाहतूक करणाऱ्या वाहनांची तपासणी केली. यामध्ये तब्बल दहा वाहनधारकांनी क्षमतेपेक्षा जास्त
वाळू व चिऱ्यांची वाहतूक केल्याचे सिद्ध झाल्याने त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात आली. तहसीलदारांनी ट्रक व डंपरची थेट तपासणी करून दंडात्मक कारवाईचा बडगा उगारल्याने वाळू व चिरे वाहतूकदार धास्तावले आहेत. (प्रतिनिधी)
संबंधित वाहनचालक व त्यांना केलेला दंड असा
फिरोज अहंमद खान (रा. कुडाळ, जि. सिंधुदुर्ग, ३००० रुपये), संदीप सत्यवान गुराम (रा. सरंबळ, जि. सिंधुदुर्ग, ३००० रुपये), नीरजकुमार सिंग (रा. कुडाळ, जि. सिंधुदुर्ग, ३००० रुपये), संतोष राठोड (रा. कुडाळ, जि. सिंधुदुर्ग, ५००० रुपये), सचिन दत्तात्रय आंबेरकर (रा. मालवण, जि. सिंधुदुर्ग, ३००० रुपये), कृष्णा बाबूराव मिरजे (रा. हेब्बाळ, ता. गडहिंग्लज, १००० रुपये), शानूर महंमद मुल्ला (रा. नेर्ली, ता. हुक्केरी, जि. बेळगाव, ५५०० रुपये), संतोष पाटील (रा. कुडाळ, जि. सिंधुदुर्ग, ३००० रुपये), जोतिबा धनवडे (रा. मुगळी, ता. गडहिंग्लज, १०५०० रुपये), उस्मान मकानदार (रा. नेर्ली, ता. हुक्केरी, जि. बेळगाव, १०५०० रुपये).