तासगाव पोटनिवडणूक : दोघांची माघार
By Admin | Updated: March 26, 2015 00:37 IST2015-03-26T00:31:13+5:302015-03-26T00:37:48+5:30
शुक्रवारी (दि. २७) दुपारी ३ वाजेपर्यंत अर्ज माघारी घेण्याची अंतिम मुदत आहे

तासगाव पोटनिवडणूक : दोघांची माघार
तासगाव : बहुचर्चित बनलेल्या तासगाव-कवठेमहांकाळ विधानसभा पोटनिवडणुकीत मंगळवारी दाखल केलेले सर्व उमेदवारी अर्ज वैध ठरले. दोन उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज मागे घेतले असल्याने सध्या १७ उमेदवारांचे अर्ज शिल्लक राहिले आहेत. शुक्रवारी (दि. २७) दुपारी ३ वाजेपर्यंत अर्ज माघारी घेण्याची अंतिम मुदत आहे.निवडणूक प्रक्रियेत दाखल झालेल्या सर्व अर्जांची छाननी बुधवारी झाली. या पोटनिवडणुकीत अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी १९ उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते. बुधवारी छाननीमध्ये सर्व अर्ज वैध ठरले असून, दोघा उमेदवारांनी आपले अर्ज मागे घेतले. किशोर दिनकर उनउने (सावळज) व नानासाहेब आनंदराव शिंदे (जरंडी) अशी त्या दोघा उमेदवारांची नावे आहेत. (प्रतिनिधी)