शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
4
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
5
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
6
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
7
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
8
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
9
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
10
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
11
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
12
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
13
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
16
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
17
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
18
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
19
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
20
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
Daily Top 2Weekly Top 5

तांब्याचीवाडी, भटवाडी होणार प्रकाशमान

By admin | Updated: June 25, 2016 00:47 IST

‘लोकमत’चा पुढाकार : स्वातंत्र्याच्या ६९ वर्षांनंतर या गावांमध्ये पहिल्यांदा वीजपुरवठा; प्रकाश आबिटकर यांचे प्रयत्न

शिवाजी सावंत-- गारगोटी भुदरगड तालुक्यातील तांब्याचीवाडी आणि भटवाडी या गावांमध्ये स्वातंत्र्याच्या ६९ वर्षांनंतर पहिल्यांदा वीजपुरवठा होणार असल्याने या दोन्ही गावांमध्ये उत्साहाचे वातावरण पसरले आहे. ही गावे प्रकाशमय होण्यासाठी आमदार प्रकाश आबिटकर यांनी प्रयत्न केले आहेत.तालुक्याच्या पश्चिम टोकाला शेवटची असणारी ही दोन गावे एरवी कोणाच्याही खीजगणतीत नसतात. मतदान कमी असल्याने केवळ निवडणुका जवळ आल्या की आश्वासने देऊन उमेदवार पसार झाले की पुन्हा निवडणूक आल्यानंतर हजर होतात. उमेदवाराने आश्वासन दिले की, तेथील भोळीभाबडी जनता गावात वीज येणार या आशेने एकटाकी मतदान करतात. उमेदवार निवडून आला की पुन्हा त्याला या मतदारांची आठवण राहत नाही, अशा परिस्थितीत या गावातील ग्रामस्थांना गप्प बसण्याशिवाय पर्याय नव्हता. देश स्वतंत्र होऊन ६९ वर्षे पूर्ण झाली आहेत, तरी ही गावे अंधारात होती़. याबाबत ‘लोकमत’ने वृत्त प्रसिद्ध केले होते.गत विधानसभा निवडणुकीपूर्वी विद्यमान आमदार प्रकाश आबिटकर यांनी मतदारसंघातील प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी संघर्ष यात्रा काढण्याचा निर्णय घेतला. या यात्रेची सुरुवात झाली. ही यात्रा मतदारसंघात फिरत फिरत या गावांमध्ये आल्यानंतर एका शाळकरी विद्यार्थ्याने आमदार आबिटकरांच्या हाताला धरून म्हणाला ‘साहेब, आम्हालाही शाळा शिकायची आहे. आमच्याकडे लक्ष देता का?’ हे वाक्य ऐकल्यावर आमदार आबिटकरांच्या अंगावर काटा उभा राहिला आणि त्या मुलांची आगतिकता पाहून डोळ्यांत पाणी तरळले. त्यांनी मनाचा निश्चय केला की, आमदार होऊ अगर ना होऊ, पण पदाच्या पलीकडे जाऊन या गावांना वीजपुरवठा करण्यासाठी जिवाचे रान करायचे; पण वीज मिळवून द्यायची.यानंतर सुदैवाने ते विक्रमी मतांनी विजयी झाले. त्यांना ती मुले सदोदित नजरेस दिसत होती. त्यांनी महाराष्ट्र शासन आणि महावितरण कंपनीच्या माध्यमातून ६९ लाख रुपये खर्चून या दोन्ही ठिकाणी वीजपुरवठा पोहोचविण्यात यश मिळविले. ही घटना म्हणजे खऱ्या अर्थाने ही दोन गावे ‘प्रकाशमान’ झाली आहेत, ही वचनपूर्तीची साक्ष देत आहेत.विद्यार्थ्यांसाठी अग्रक्रमाने काम पूर्ण प्रकाश आबिटकर म्हणाले, राजकारणात उलथापालथी होत असतातच; पण समाजाचे प्रतिनिधित्व करीत असताना काही रचनात्मक काम करणे हे आपले कर्तव्य आहे. स्वातंत्र्याच्या सत्तरीत ही गावे अंधारात ठेवून आपण नेमका कोणता विकास साधला आहे? या प्रश्नाचे उत्तर सर्व राजकीय पक्षांना भविष्यात द्यावे लागले असते. याशिवाय त्या निरागस विद्यार्थ्यांचा चेहरा सदैव माझ्या डोळ्यांसमोर उभा राहत होता, म्हणून मी अग्रक्रमाने हे काम पूर्ण करण्याची काळजी घेतली.