इंगळी परिसरात उसावर तांबेरो, लोकरी मावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2021 04:17 IST2021-06-18T04:17:42+5:302021-06-18T04:17:42+5:30
इंगळी : गावासह परिसरामध्ये सध्या उसावर तांबेरा व लोकरी मावा रोगाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात झाला आहे. पीक वाढीच्या काळातच ...

इंगळी परिसरात उसावर तांबेरो, लोकरी मावा
इंगळी : गावासह परिसरामध्ये सध्या उसावर तांबेरा व लोकरी मावा रोगाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात झाला आहे. पीक वाढीच्या काळातच रोगाने उसाची वाढ रोखली आहे. त्यामुळे शेतकरी वर्ग अस्वस्थ झाला आहे.
चालू वर्षी लवकर झालेल्या वळीवाच्या पावसामुळे उन्हाळ्यात पिकांना पाणीटंचाई भासली नाही. परिणामी परिसरात उसाच्या आडसाली व हंगामी लागणींसह खोडवा पिकांची वाढ चांगली झाली आहे. मात्र, गेल्या काही दिवसांपासून उसावर तांबेरा व लोकरी मावा रोगाचा प्रादुर्भाव होत आहे व दिवसेंदिवस वाढतच आहे. सध्या उसावर रोगाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात झाला असून रोगाने उसाची वाढ रोखली आहे. ८६०३३ उसावर लोकरी मावा रोगाचे प्रमाण अधिक आहे. ०२६५ उसावर तांबेरा रोगाचा प्रादुर्भाव अधिक आहे. चांगली रोगप्रतिकारशक्ती, अग्रक्रमाने तोडणी व उत्पादनही चांगले त्यामुळे चालू वर्षी १०००१ या उसाच्या वाणाची लागवडही मोठ्या क्षेत्रावर झाली आहे. मात्र, चालू वर्षी हे वाणही तांबेरा रोगाला बळी पडल्याने ऊस उत्पादक शेतकरी अस्वस्थ झाला आहे.
फोटो ओळी
१७०६२०२१-आयसीएच-०२
१७०६२०२१-आयसीएच-०३
इंगळी (ता. हातकणंगले) परिसरासह उसावर तांबेरा रोगाचा प्रादुर्भाव झाल्याने ऊसपिके तांबडी पडली आहेत.