राष्ट्रवादीचा आजपासून तालुकानिहाय आढावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 22, 2021 04:27 IST2021-08-22T04:27:41+5:302021-08-22T04:27:41+5:30
कोल्हापूर : राष्ट्रवादी काँग्रेसने आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती व नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज, रविवारपासून संपूर्ण जिल्ह्यात तालुकानिहाय आढावा ...

राष्ट्रवादीचा आजपासून तालुकानिहाय आढावा
कोल्हापूर : राष्ट्रवादी काँग्रेसने आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती व नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज, रविवारपासून संपूर्ण जिल्ह्यात तालुकानिहाय आढावा बैठकीचे आयोजन केले आहे. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील व ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्या सूचनेनुसार तालुका व विधानसभा मतदारसंघातील प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या कामाचा आढावा घेतला जाणार आहे. जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील, कार्याध्यक्ष अनिल साळोखे यांच्या प्रमुख उपस्थितीत या आढावा बैठका होत असून आज, रविवारी शिरोळ, इचलकरंजी तर उद्या, सोमवारी करवीर, पन्हाळा व शाहूवाडी तालुक्यातील बैठक होणार आहे. गुरुवारी (दि. २६) गगनबावडा, राधानगरी, भुदरगड तर शनिवारी (दि. २८) गडहिंग्लज, चंदगड व आजरा २९ ऑगस्ट रोजी कागल व कोल्हापूर दक्षिण मतदारसंघाचा आढावा घेतला जाणार असल्याची माहिती कार्याध्यक्ष अनिल साळोखे यांनी दिली.