नेजदारांच्या डोक्यात खुर्ची घालणारे मंत्र्यांच्या गळ्यातील ताईत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 27, 2021 04:24 IST2021-04-27T04:24:43+5:302021-04-27T04:24:43+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : ‘गोकुळ’च्या करवीर संपर्क सभेत राजाराम कारखान्याचे माजी अध्यक्ष विश्वास नेजदार यांच्या डोक्यात खुर्ची घालून ...

नेजदारांच्या डोक्यात खुर्ची घालणारे मंत्र्यांच्या गळ्यातील ताईत
लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : ‘गोकुळ’च्या करवीर संपर्क सभेत राजाराम कारखान्याचे माजी अध्यक्ष विश्वास नेजदार यांच्या डोक्यात खुर्ची घालून खुनशी वृत्ती दाखवणारेच आता गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांच्या गळ्यातील ताईत झाल्याचा आरोप गडमुडशिंगीचे उपसरपंच तानाजी पाटील यांनी पत्रकातून केला.
विश्वास नेजदार हे कसबा बावड्यातील पितृतुल्य व्यक्तिमत्त्व असल्याने महादेवराव महाडिक यांनी त्यांना ‘राजाराम’ कारखान्यात संधी दिली. कालांतराने ते सतेज पाटील गटात गेले. तरीही महाडिक यांची त्यांच्याविषयी कायम आदराची भावना राहिली. तीन वर्षांपूर्वी ‘गोकुळ’मध्ये मल्टीस्टेट विषयावर उत्पादकांशी चर्चा सुरू असताना विश्वास पाटील यांचा पुतण्या व त्यांच्या समर्थकांनी नेजदार यांच्या डोक्यात खुर्ची घातली. या घटनेनंतर महादेवराव महाडिक यांनी विश्वास पाटील यांना कडक समज देऊन दुसऱ्याच दिवशी नेजदार यांच्या घरात जाऊन झालेल्या घटनेबद्दल दिलगिरी व्यक्त केली. मल्टीस्टेट विरोधात नेजदार, किशोर पाटील, विजय माेरे, बाळासाहेब कुपेकर, बाबासाहेब देवकर, किरण पाटील या शिलेदारांनी संघर्ष केला, मात्र त्यांना डावलण्यात आले. ‘गोकुळ‘निवडणुकीत विश्वासघातकी राजकारणाचे उट्टे काढण्याचा चंग दूध उत्पादकांनी बांधल्याचे तानाजी पाटील यांनी पत्रकात म्हटले आहे.