शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

तलाठी बाहेर पडले शासकीय ‘व्हॉटस् अ‍ॅप’ ग्रुपमधून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 6, 2019 12:41 IST

कामाव्यतिरिक्त वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून त्रास दिला, याच्या निषेधार्थ तलाठ्यांनी सर्व शासकीय व्हॉट्स अ‍ॅप ग्रुपवरून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार कोल्हापूर जिल्हा तलाठी संघाने सोमवारी (दि. ४) जिल्हाधिकारी दौलत देसाई यांना निवेदन दिले.

ठळक मुद्देतलाठी बाहेर पडले शासकीय ‘व्हॉटस् अ‍ॅप’ ग्रुपमधून जिल्हाधिकाऱ्यांना दिली माहिती : विविध मागण्यांचे निवेदनही सादर

कोल्हापूर : रात्री अपरात्री कधीही व्हॉटस् अ‍ॅपवरून संदेश पाठवून तलाठ्यांना शासकीय कामांसाठी बोलवून घेण्याचे प्रकार वाढले आहेत. आपत्ती किंवा निवडणुकीच्या कामाव्यतिरिक्त अशा पद्धतीने वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून त्रास दिला आहे. याच्या निषेधार्थ तलाठ्यांनी सर्व शासकीय व्हॉट्स अ‍ॅप ग्रुपवरून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार कोल्हापूर जिल्हा तलाठी संघाने सोमवारी (दि. ४) जिल्हाधिकारी दौलत देसाई यांना निवेदन दिले.निवेदनात म्हटले आहे की, शासनाकडून तलाठी संवर्गाच्या मागण्यांची पूर्तता करण्यास होणारे दुर्लक्ष आणि वरिष्ठ अधिकाºयांकडून कामासाठी येणारा दबाव लक्षात घेता, सर्व शासकीय कार्यालयांनी ‘व्हॉटस् अ‍ॅप’ गु्रपमधून बाहेर पडण्याचा निर्णय २३ आॅगस्टला महाराष्ट्र राज्य तलाठी संघाने घेतला.

यात शासकीय सुट्टीदिवशी नैसर्गिक आपत्ती व निवडणूक काम हे अपवाद होते; परंतु आॅगस्ट, सप्टेंबर महिन्यातील महापुरामुळे कोल्हापूर व सांगली जिल्ह्यांत या निर्णयाला तलाठी संघाकडून तात्पुरती स्थगिती देण्यात आली होती.

त्यानंतरही पूरग्रस्तांना अनुदान वाटप व विधानसभा निवडणुकीच्या कामामध्ये समन्वय राहावा, या उद्देशाने निवडणुकीची आचारसंहिता संपेपर्यंत निर्णय लांबणीवर टाकला होता; परंतु आता जिल्ह्यातील सर्व तलाठी व्हॉटस् अ‍ॅप ग्रुपमधून बाहेर पडत आहेत.त्याचबरोबर आॅनलाईन सातबारा प्रकल्पातील पायाभूत सुविधा पुरविण्याकडे दुर्लक्ष होत आहे. रिक्त पदांची भरती रेंगाळल्याने तलाठ्यांवर अतिरिक्त पदभार पडत आहे. तलाठी सज्जा पुनर्रचना निर्णयाची अंमलबजावणी करण्यास टाळाटाळ केली जात आहे, आदी मागण्यांकडेही लक्ष वेधण्यात आले आहे.शिष्टमंडळात जिल्हाध्यक्ष धनाजी कलिकते, सरचिटणीस अनंत दांडेकर, बी. एस. खोत, अजित बेलवेकर, संजय सुतार, चंद्रकांत म्हसवेकर, एकनाथ शिंदे, आदींचा समावेश होता. 

 

टॅग्स :Social Mediaसोशल मीडियाcollectorजिल्हाधिकारीkolhapurकोल्हापूर