कोवाड व्यापारी मंडळातर्फे तलाठी दीपक कांबळे यांचा सत्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2021 04:29 IST2021-08-20T04:29:38+5:302021-08-20T04:29:38+5:30

महापुरात कोवाड गावासाठी व व्यापारी बंधूंच्या साठी चांगली सेवा बजावली होती तसेच कोरोना काळात सुद्धा गावात कडक निर्बंधाची अंमलबजावणी ...

Talathi Deepak Kamble felicitated by Kovad Chamber of Commerce | कोवाड व्यापारी मंडळातर्फे तलाठी दीपक कांबळे यांचा सत्कार

कोवाड व्यापारी मंडळातर्फे तलाठी दीपक कांबळे यांचा सत्कार

महापुरात कोवाड गावासाठी व व्यापारी बंधूंच्या साठी चांगली सेवा बजावली होती तसेच कोरोना काळात सुद्धा गावात कडक निर्बंधाची अंमलबजावणी करून रुग्णसंख्या आटोक्यात ठेवली व कोवाड गावासाठी चांगली सेवा बजावली व त्यांच्या या कार्याची दखल घेऊन व्यापारी संघटनेचे अध्यक्ष दयानंद सलाम यांच्याहस्ते सत्कार झाला.

यावेळी नूतन तलाठी राजश्री पंचडी, माजी उपसरपंच विष्णू आढाव, व्यापारी सचिन पाटील, नंदकुमार बेळगावकर, विनायक पोटेकर, जोतिबा पाटील, पुंडलिक लाड, प्रवीण गवेकर, सुधीर जाधव, अमित नावलगी, बाळू साळुंके आदीसह व्यापारी उपस्थित होते.

फोटो ओळी : कोवाड (ता. चंदगड) येथे बदलीनिमित्त तलाठी दीपक कांबळे यांचा सत्कार करताना दयानंद सलाम. शेजारी नंदकुमार बेळगावकर, आढाव, तलाठी पंचडी, पाटेकर, पाटील आदी उपस्थित होते.

क्रमांक : १९०८२०२१-गड-०२

Web Title: Talathi Deepak Kamble felicitated by Kovad Chamber of Commerce

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.