शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
6
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
7
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
8
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
9
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
10
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
11
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
12
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
13
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
14
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
15
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
16
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
17
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
20
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  

भाजप विरोधात शिवसेनेच्या हातात टाळ -मृदंग, अंबाबाई मंदिरासमोर भजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 15, 2020 19:00 IST

bjp, shivsena, Mahalaxmi Temple Kolhapur भाजपने मंदिरे खुली करण्यासाठी मिरजकर तिकटी येथे उद्धवा, दार उघड हे आंदोलन केले. शिवसेनेने याचा गुरुवारी चांगलाच समाचार घेतला. अंबाबाई मंदिर येथील महाद्वार चौकात टाळ-मृदंगाच्या गजराने भजन करत अनोखे आंदोलन केले.

ठळक मुद्देअंबाबाई मंदिरासमोर भजन करून मंदिर उघडण्याच्या भाजपच्या आंदोलनाचा समाचार दादांनी पालकमंत्री असताना काय दिवे लावले : रविकिरण इंगवले

कोल्हापूर :भाजपने मंदिरे खुली करण्यासाठी मिरजकर तिकटी येथे उद्धवा, दार उघड हे आंदोलन केले. शिवसेनेने याचा गुरुवारी चांगलाच समाचार घेतला. अंबाबाई मंदिर येथील महाद्वार चौकात टाळ-मृदंगाच्या गजराने भजन करत अनोखे आंदोलन केले.

शिवसेना शहरप्रमुख रविकिरण इंगवले यांनी आमदार चंद्रकांत पाटील यांचा खरपूस शब्दात समाचार घेत पालकमंत्री असताना पाच वर्षात काय दिवे लावले, असा आरोप केला. शहरातील विकासकामांच्या केवळ घोषणा केल्या. अंमलबजावणी शून्य असल्याचेही त्यांनी निदर्शनास आणले.शहरप्रमुख इंगवले म्हणाले, अंबाबाई मंदिरामध्ये रोज हजारो भाविक दर्शनासाठी येतात. यामुळे कोरोना संसर्ग वाढण्याचा धोका आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांचा निर्णय योग्यच आहे. या विरोधात कोणी चुकीचा अर्थ लावून आंदोलन करत असेल तर खपवून घेणार नाही. भाजपने सत्तेवर असताना काय दिवे लावलेत ते सर्वांना माहीत आहे.

पालकमंत्री असताना चंद्रकांत पाटील यांनी घोषणांचा पाऊस पाडला. यामध्ये अंबाबाई मंदिर विकास आराखड्यासाठी २२० कोटी देत असून पाच वर्षात काम पूर्ण करण्याचा शब्द दिला होता. यामध्ये एकही काम झाले नाही. खोटे बोलून रेटून घोषणांचा पाऊस पाडणाऱ्या दादांचे ब्रीदवाक्य कोल्हापूरकरांना माहीत झाले असल्यामुळे त्यांनी कोथरुडमधून निवडणूक लढवली. त्यांनी व भाजपने शिवसेनेला हिंदुत्व शिकवू नये. मोदींनी कष्टातून देशात मिळवलेली सत्ता चंद्रकांत पाटील यांच्यासारख्या लोकांमुळे गमावण्याची वेळ आली आहे. यावेळी आबाजी जगदाळे, सुकुमार लाड, बंडा लोंढे, सचिन चौगले, सागर साळोखे, आदी उपस्थित होते.

भाजपला केलेले सवाल

  • पाच वर्ष पालकमंत्री होता, अंबाबाई तीर्थक्षेत्र विकास आराखड्याचे काय केले.
  • पाच वर्षात कोल्हापूरसाठी निधी आणला नाही.
  • रंकाळा संवर्धन, पंचगंगा प्रदूषणाचे काय झाले.
  • शहर खड्डेमुक्त करण्याच्या घोषणेचे काय झाले.
  • गोव्यातही मंदिर बंद आहे. हे दिसत नाही काय.

 

टॅग्स :Shiv SenaशिवसेनाMahalaxmi Temple Kolhapurमहालक्ष्मी मंदिर कोल्हापूरkolhapurकोल्हापूर