शहरं
Join us  
Trending Stories
1
Narendra Modi : "राजपुत्र उघडपणे सांगत आहेत..."; राहुल गांधींच्या जुन्या Video चा उल्लेख करत मोदींचा घणाघात
2
उत्तर प्रदेशमध्ये बनावट मतदान, अनेक खुलासे; २५ मे रोजी होणार पुन्हा मतदान
3
लोकसभा निवडणुकीदरम्यान बीड आणि बारामतीमध्ये बोगस मतदान, शरद पवारांचा गंभीर आरोप  
4
भोंगळ कारभार! मतदान करता न आल्यानं कलाकार संतापले; सांगितलं नेमकं काय घडलं
5
‘ही लढाई संपलेली नाही, तर आता खरी सुरुवात झालीय’, जयंत पाटील यांचं शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांना भावूक पत्र 
6
सॅमसंगची मोठी घोषणा! तुम्ही तुमचा फुटलेला किंवा खराब झालेला फोन वर्षातून दोनदा दुरुस्त करू शकता
7
"उद्धव ठाकरे यांनी नेहमीप्रमाणे त्यांचे रडगाणे सुरु केले आहे"; देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
8
‘...हा तर अरविंद केजरीवाल यांच्या हत्येचा कट’, ‘आप’चा PMO वर सनसनाटी आरोप
9
... म्हणूनच काँग्रेसवाले आमच्या वाहनांवर हल्ले करतायत; कंगना यांचा गंभीर आरोप
10
प्लेऑफमध्ये KKR विरुद्ध SRHचं पारडं जड, अशी आहे आकडेवारी, थेट फायनल गाठणार की…
11
पंतप्रधान नेतन्याहू आणि हमास प्रमुखांना अटक होणार? ICC अटक वॉरंट जारी करण्याच्या तयारीत
12
मुंबईकर आजोबांना सलाम! नाकात नळी, मतदानाला आले, ओळखपत्र विसरले; पुढे...
13
जिथे शिवसेनेचं मतदान आहे, तिथे...; निवडणूक आयोग भाजपाची चाकरी करत असल्याचा उद्धव ठाकरेंचा आरोप
14
निवडणूक आयोगाच्या नियोजनावर भाजपाही संतापली; "मतदारांचे हाल दुर्दैवी, यातून..."
15
लोकसभेची उमेदवारी घेऊन वायकरांनी आपली अटक टाळली; गजानन कीर्तीकरांचा खळबळजनक दावा
16
"जे लोक मतदान करणार नाहीत त्यांना..."; अभिनेते परेश रावल यांनी मांडली रोखठोक भूमिका
17
अमेरिका, कॅनडा, अरब देशातून AAP ला अवैध फंडिग; ED नं गृह मंत्रालयाला सोपवला रिपोर्ट
18
पुरती दमछाक झाली, वडिलांची उणीव मात्र भासली; अमोल कीर्तिकर यांनी व्यक्त केली भावना
19
Maharashtra Mumbai Kalyan Lok Sabha Election 2024 Live Updates: लोकसभेच्या पाचव्या टप्प्यात 57 टक्क्यांहून अधिक मतदानाची नोंद; 49 जागांसाठी मतदान
20
बुलढाणा: आग लागल्याने घरातील साहित्य जळून खाक, संपूर्ण कुटुंब बेघर

Kolhapur: बनावट सोने गहानवट ठेवून कर्जाची उचल, युनियन बँकेच्या लक्ष्मीपुरी शाखेला ५७ लाखांवर गंडा

By भीमगोंड देसाई | Published: March 01, 2024 5:45 PM

२३ जणांवर गुन्हा, सहा अटकेत

कोल्हापूर : लक्ष्मीपुरी येथील युनियन बँक ऑफ इंडियाच्या शाखेत बनावट सोने गहानवट देवून कर्जाची उचल करून बँकेस ५७ लाख १८ हजार ३७१ रूपयांस गंडा घातल्याचे शुक्रवारी उघड झाले. याप्रकरणी बँकेचा अधिकृत मूल्यांकणकार आणि कर्जदार असे एकूण २३ जणांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. यातील सागर अनिल कलघटगी ( वय ३८ रा. धनवडे गल्ली, शुक्रवार पेठ, कोल्हापूर), श्रावण विजय हळदणकर (वय २५, जैनमठ गल्ली, शुक्रवार पेठ शनिवार पेठ, कोल्हापूर), गोपीनाथ बाळासाहेब शेडगे (३२ रा. रेडेकर गल्ली, लक्षतिर्थ वसाहत, कोल्हापूर), ओंकार प्रकाश शिंदे (वय २०, रा. म्हाडा कॉलनी, एसएससी बोर्ड जवळ, राजेंद्र नगर, राजारामपुरी, कोल्हापूर), सुजल रविंद्र शिंदे,( वय १९ रा. म्हाडा कॉलनी, राजेंद्र नगर, एसएससी बोर्डाजवळ, कोल्हापूर), तुषार विजय जाधव (वय ३२, रा. जाधव गल्ली, जाधववाडी, कोल्हापूर) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.सतीश बाळकृष्ण पोतदार (रा. संभाजी नगर, देवकर पाणंद, कोल्हापूर), रजनीकांत बाबुराव वडगावकर (रा. तेली गल्ली, शुक्रवार पेठ, कोल्हापूर), युवराज महादेव बसुगडे (रा. शिंदे गल्ली, शुक्रवार पेठ, कोल्हापूर), रोहीणी राजेंद्र पाटील (रा. वळीवडे गल्ली, तळसंदे), उर्मिला मंगेश पाटील (रा. बोडके गल्ली, जुना शुक्रवार पेठ कोल्हापूर), मारुती सखाराम कोल्हटकर (रा. पाटील कॉलनी, मणेर मळा, उंचगाव), स्वलिया इकबाल सरकवास (रा. डंगरी बोळ, शुक्रवार पेठ, कोल्हापूर), सतीश बम्हदेव कांबळे (रा. हरीजन वाडा, कुरकली बेले), साऊ सखाराम कोल्हटकर (रा. पाटील कॉलनी, मणेर मळा, उचगांव), असिफ नुरमहोम्मद सरखवास (रा. सरखवास कॉलनी, सरनाईक वसाहत जवळ, जवाहर नगर, कोल्हापूर),

यश राजेश भुते (रा. एस टी कॉलनी, बळवंत तारा अपार्टमेंट, राजारामपुरी, कोल्हापूर) उज्वला संताेष रणवरे (रा. विक्रम नगर, कोल्हापूर), सागर राजन चावरे (रा. ओम गणेश कॉलणी, संभाजी नगर, कोल्हापूर), प्रथमेश प्रमोद संकपाळ ( रा. गरगाटे गल्ली, मु. पो. कोथळी, कोल्हापूर), सादीक शिंकदर शेख (रा. प्रियदर्शनी कॉलनी, कबनूर), विकास सुरेश जाधव (रा. मधली गल्ली, घानवडे), संग्राम दत्तात्रय सावंत (रा. हनुमान मंदिर सावंत गल्ली, शिंदेवाडी, फणसवाड) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.मार्च २०२३ ते फेब्रुवारी २०२४ या दरम्यान ही फसवणूक झाली आहे. यातील सागर कलघटगी हे बँकेचे अधिकृत मूल्यांकनकार होते. उर्वरित २२ जणांनी कर्जाची उचल केली. यांच्या विरोधात बँकेचे मुख्य व्यवस्थापक दिपक कुमार रविंद्र प्रसाद साह ( वय ४२, मूळ : बिहार, सध्या रा. अंबाई टँकजवळ, रंकाळा, कोल्हापूर) यांनी पोलिसात फिर्याद दिली.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरCrime Newsगुन्हेगारीfraudधोकेबाजीbankबँक