शहरं
Join us  
Trending Stories
1
लाडकी बहीण योजनेत ४,८०० कोटींचा मोठा घोटाळा; सुप्रिया सुळेंचा महायुती सरकारवर गंभीर आरोप
2
'तुम्ही २० वर्षे विरोधी बाकावरच बसणार...', ऑपरेशन सिंदूरवरील चर्चेदरम्यान अमित शाह संतापले
3
उद्धव ठाकरेंची मातोश्रीवर भेट, राज ठाकरेंचे ट्वीट; महायुतीला इशारा की समीकरणाचे सूचक संकेत?
4
Mahadevi Elephant: अखेर 'महादेवी' हत्तीणीला निरोप देताना गावकऱ्यांना अश्रू अनावर; नांदणीत लोटला जनसागर
5
आणखी स्वस्त होणार कर्ज; ऑगस्टमध्ये पुन्हा एकदा रेपो दरात RBI कपात करण्याची शक्यता
6
माती खाऊन २४ कॅरेट सोने बाहेर टाकणारा बॅक्टेरिया सापडला; वैज्ञानिकांची तर लॉटरीच लागली...
7
Nag Panchami 2025: नागपंचमी का साजरी केली जाते, यामागील पौराणिक कथा वाचलीत का?
8
"पहलगाम दहशतवाद्यांचा खात्मा करणाऱ्या सैन्याला सॅल्यूट, हल्ला करणारे १०० वेळा विचार करतील"
9
चीनचा भारताला मोठा 'धक्का'! 'रेअर अर्थ' बंदीमुळे 'या' ५ क्षेत्रांवर थेट परिणाम, SBI चा गंभीर इशारा!
10
"TCS मधील कपात तर सुरुवात आहे, अजून अनेक कंपन्यांमध्ये AI चा फटका बसणारे"
11
Jharkhand: झारखंडमध्ये भीषण अपघात, कावडियांची बस ट्रकवर आदळली; १९ जणांचा मृत्यू
12
२५ वर्षीय CA तरुणानं उचललं टोकाचं पाऊल; 'हेलियम गॅस' शरीरात घेत आयुष्याचा शेवट केला, कारण...
13
Stock Market Today: सलग तिसऱ्या दिवशी शेअर बाजारात विक्रीचा सपाटा, Sensex २७१ अंकांनी घसरला; IT-मेटल स्टॉक्स कमकुवत
14
"सलमानने चाकू माझ्या गळ्यावर धरला आणि जोरात...", अशोक सराफ यांनी सांगितला भाईजानचा तो प्रसंग
15
भीषण! गाझामध्ये उपासमारीने १४७ लोकांचा मृत्यू, ४० हजार लहान मुलांचा जीव धोक्यात
16
FD-RD झाली जुनी, आता ‘या’ ५ स्कीम्सची चर्चा; वर्षभरात तगडा नफा हवा असेल तर ही डिटेल्स तपासा
17
'सैयारा'साठी 'या' रिअल लाईफ जोडीला होती ऑफर, मोहित सूरींनी बदलला निर्णय; कारण...
18
Nimisha Priya : केरळमधील नर्स निमिषा प्रियाची फाशीची शिक्षा रद्द; भारताच्या मुत्सद्देगिरीला अखेर यश
19
"तुझे ओठ सेक्सी आहेत, किस करू?", असित मोदींवर TMKOC फेम अभिनेत्रीचे गंभीर आरोप
20
"तो मला टॉर्चर करतोय"; पत्नीच्या पोलीस तक्रारीनंतर पती घरातून पळाला, पण त्यानंतर जे घडलं...

उद्योगांचा सूर.. नंबर वन कोल्हापूर; जिल्ह्यातील १२०० हून अधिक तरुणांनी उभारले उद्योग  

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 3, 2025 19:31 IST

जिल्हा उद्योग केंद्राची अतुलनीय कामगिरी

पोपट पवारकोल्हापूर : एकीकडे नोकरी नाही म्हणत सरकारच्या नावाने ओरडणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत असली, तरी सरकारच्याच योजनांचा योग्यरीत्या लाभ घेत कोल्हापूर जिल्ह्यातील १२०० हून अधिक तरुण नवउद्योजकांनी स्वत:चे उद्योग-व्यवसाय उभारत ‘राज्यात भारी, आम्ही कोल्हापुरी’चा नारा बुलंद केला आहे. २०२४-२५ या एका वर्षात मुख्यमंत्री रोजगारनिर्मिती कार्यक्रमांतर्गत (सीएमईजीपी) १२२२ जणांनी उद्योग उभारून राज्यात सर्वाधिक उद्योग, सर्वाधिक अनुदान व सर्वाधिक अनुदानाचे वाटप करत तिन्ही कॅटेगरीत कोल्हापूर जिल्हा नंबर वन ठरला आहे. मुख्यमंत्री रोजगारनिर्मिती योजनेद्वारे उत्पादन क्षेत्रातील उद्योजकाला ५० लाख रुपये, तर सेवा क्षेत्रातील उद्योजकाला २० लाखांपर्यंत कर्ज दिले जाते. सर्वसाधारण प्रवर्गातील उद्योजकाला प्रकल्पाच्या एकूण कर्ज रकमेच्या १५ ते २५ टक्के, तर विशेष प्रवर्ग, एससी, एसटी, अपंग, माजी सैनिक, ओबीसी व अल्पसंख्यकांना २५ ते ३५ टक्के अनुदान दिले जाते. जिल्हा उद्योग केंद्राकडे अर्ज केल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखालील समितीने मान्यता दिल्यानंतर संबंधित प्रकरण बँकेकडे जाते. बँकेने कर्ज प्रकरणाला मंजुरी दिल्यानंतर लाभार्थींच्या खात्यात अनुदान जमा होते. १ एप्रिल २०२४ ते ३१ मार्च २०२५ या आर्थिक वर्षात जिल्हा उद्योग केंद्राला सीएमईजीपी अंतर्गत १२०० लाभार्थी करण्याचे उद्दिष्ट दिले होते. जिल्हा उद्योग केंद्राने १२२२ जणांना लाभ देत १०१.८ टक्के इतके उद्दिष्ट गाठले आहे. गारमेंटमध्ये सर्वाधिक १४४, अन्न प्रक्रिया २६, ब्युटीमध्ये ३२, फॅशन डिझायनिंगमध्ये ४०, टेक्सटाईलमध्ये ४५, ट्रान्सपोर्टमध्ये ६० असे उद्योग उभारले आहेत.७० कोटींचे अनुदानऔद्योगिक मशिनरी, मसाले, बेदाणे, बेकरी, अन्नप्रक्रिया, पैठणी, पॉवरलूम यासारख्या उद्योगांना अनुदान दिले जाते. जिल्ह्यात २०२४-२५ या एका वर्षात ७० कोटी ४० लाख रुपयांचे अनुदान लाभार्थ्यांना मंजूर झाले. यातील ३२ कोटी २२ लाख रुपयांच्या अनुदानाचे वाटप करण्यात आले. ही संख्या राज्यात सर्वाधिक आहे.

कोणत्या तालुक्यात किती लाभार्थीतालुका -  उद्दिष्ट - मंजूर  -  टक्केवारीकरवीर  -   ३५६  - ३८१  - १०७शिरोळ  - १२०  - १४४  -  १२०हातकणंगले  - २२०  -  ३२७  - १४८.६पन्हाळा  - ८०  - ९७ - १२१.३गगनबावडा - २० -  १२ - ६०भुदरगड - ६० -  ३२  - ५३.३३राधानगरी  - ६४   -  ८०  - १२५शाहुवाडी  -  ४०   -  २९  -  ७२.५कागल  -  ८०  - ५५  -  ६८.७५गडहिंग्लज -  ८०  -  ३१  -  ३८.७५आजरा  - ४०  -  १२  - ३०चंदगड  - ४०  - २२   -  ५५राष्ट्रीयीकृत बँका भारीसीएमईजीपीत जिल्ह्यातील राष्ट्रीयीकृत बँकांच्या २३१ शाखांनी ८४६ इतकी कर्ज प्रकरणे मंजूर केली आहेत. तर खासगी बँकांच्या १९७ शाखांमधून अवघी २४२ कर्ज प्रकरणे मंजूर करण्यात आली.

मुख्यमंत्री रोजगारनिर्मिती कार्यक्रमांतर्गत उद्योग-व्यवसाय उभारण्यासाठी अनुदान दिले जाते. २०२४-२५ या एका वर्षात १२२२ जणांनी याचा लाभ घेतला आहे. सीएमईजीपीत जिल्ह्याने उद्दिष्ट पूर्ण केले असून, अनुदान वाटपात कोल्हापूर राज्यात अव्वल आहे. - अजयकुमार पाटील, महाव्यवस्थापक, जिल्हा उद्योग केंद्र, कोल्हापूर

टॅग्स :kolhapurकोल्हापूर