शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
4
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
5
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
6
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
7
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
8
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
9
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
10
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
11
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
12
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
13
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
14
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
15
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
16
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
17
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
18
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
19
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
20
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

अलमट्टीच्या उंचीविरोधात रस्त्यावर उतरू : चंद्रकांत पाटील यांचा इशारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 27, 2020 16:52 IST

कर्नाटकातील अलमट्टी धरणाची उंची ५२४ मीटरपर्यंत नेण्याचा प्रयत्न झाला, तर कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यांना याचा मोठा फटका बसेल. त्यामुळे वस्तुस्थिती केंद्रीय नेतृत्वाला समजून सांगू; मात्र वेळ पडली तर याविरोधात रस्त्यावर उतरण्यासही मागे पडणार नाही, असा इशारा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पत्रकाद्वारे दिला आहे.

ठळक मुद्देअलमट्टीच्या उंचीविरोधात रस्त्यावर उतरू चंद्रकांत पाटील यांचा इशारा

कोल्हापूर : कर्नाटकातील अलमट्टी धरणाची उंची ५२४ मीटरपर्यंत नेण्याचा प्रयत्न झाला, तर कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यांना याचा मोठा फटका बसेल. त्यामुळे वस्तुस्थिती केंद्रीय नेतृत्वाला समजून सांगू; मात्र वेळ पडली तर याविरोधात रस्त्यावर उतरण्यासही मागे पडणार नाही, असा इशारा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पत्रकाद्वारे दिला आहे.कर्नाटकचे मुख्यमंत्री येडीयुरप्पा यांनी अलमट्टीची उंची वाढवण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेटणार असल्याचे मंगळवारी (दि. २५) जाहीर केले होते. या पार्श्वभूमीवर पाटील यांनी हे पत्रक प्रसिद्धीस दिले आहे.पत्रकात पाटील म्हणतात, सर्वोच्च न्यायालयाने नेमलेल्या लवादाचे आदेश, तांत्रिक बाबी, आजवरची पुराची आकडेवारी तपासूनच याबद्दलचा निर्णय केंद्र सरकारला घ्यावा लागेल. कोल्हापूर जिल्ह्यातील शेती, वित्त आणि जीवित मालमत्ता यांची हानी होणार नाही, याची काळजी घेणे ही केंद्र सरकारची जबाबदारी आहे.

मुळात अलमट्टी धरणाबद्दलच्या काही बाबी न्यायप्रविष्ट आहेत. हा महाराष्ट्रासह कर्नाटक, आंध्रप्रदेश आणि तेलंगणा या चार राज्यांशी संबंधित विषय आहे. त्यामुळे पंतप्रधान किंवा केंद्र सरकार घाईगडबडीने किंवा एकांगी निर्णय घेणार नाही. कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी भूमिका कायम ठेवली, तर त्यांनाही पश्‍चिम महाराष्ट्रावर होणाऱ्या अन्यायाची कल्पना देऊ.

कोणत्याही परिस्थितीत कोल्हापूरसह पश्‍चिम महाराष्ट्रावर महापुराची टांगती तलवार कायम राहणार नाही, यासाठी दक्ष राहू. गतवर्षीच्या महापुराची भीषणता, त्यातून झालेले नुकसान यांची पूर्ण जाणीव असल्याने, या प्रश्‍नी तोडगा काढण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे पाटील यांनी म्हटले आहे.

टॅग्स :chandrakant patilचंद्रकांत पाटीलDamधरणkolhapurकोल्हापूरKarnatakकर्नाटक