नुकसानीचे फोटो स्वत: काढा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2021 04:29 IST2021-08-14T04:29:43+5:302021-08-14T04:29:43+5:30

शिरोली :- पुरामध्ये नुकसान झालेल्या शेतीचे फोटो अधिकाऱ्यांनी स्वत: जाऊन काढावेत, शेतकऱ्यांना त्रास देऊ नये, अशा सूचना आमदार सदाभाऊ ...

Take photos of the damage yourself | नुकसानीचे फोटो स्वत: काढा

नुकसानीचे फोटो स्वत: काढा

शिरोली :- पुरामध्ये नुकसान झालेल्या शेतीचे फोटो अधिकाऱ्यांनी स्वत: जाऊन काढावेत, शेतकऱ्यांना त्रास देऊ नये, अशा सूचना आमदार सदाभाऊ खोत यांनी दिल्या. ते शिरोलीत महापुरामुळे नुकसान झालेल्या शेतीची पाहणी करण्यासाठी आले होते. यावेळी त्यांनी नुकसानीच्या पंचनाम्याबाबत कृषी अधिकारी व तलाठ्याकडून माहिती घेतली. यावेळी सरपंच शशिकांत खवरे, उपसरपंच सुरेश यादव, तंटामुक्त अध्यक्ष सतीश पाटील, ग्रामसेवक व्ही. बी. बोगम, तलाठी नीलेश चौगुलेे, कृषी सहाय्यक प्रमोद कांबळेे, कोतवाल संदीप पुजारी, प्रकाश कौंदाडे उपस्थित होते.

फोटो १३ शिरोली खोत भेट

-

शिरोली ग्रामपंचायत कार्यालयात पूर नुकसानीबाबत आमदार सदाभाऊ खोत यांनी अधिकारी-पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली. यावेळी सरपंच शशिकांत खवरे, उपसरपंच सुरेश यादव, सतीश पाटील उपस्थित होते.

Web Title: Take photos of the damage yourself