शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
4
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
5
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
6
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
7
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
8
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
9
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
10
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
11
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
12
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
13
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
14
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
15
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
16
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
17
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
18
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
19
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
20
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
Daily Top 2Weekly Top 5

रुग्णालयात दाखल होताना आवश्यक साहित्य घ्या; धावपळ टाळा

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 20, 2020 22:13 IST

- समीर देशपांडे  कोल्हापूर : महापालिका, नगरपंचायत, ग्रामपंचायतींमधून तुम्ही कोरोना पॉझिटिव्ह आहात म्हणून तुम्हाला फोन येतो आणि घरातील वातावरण ...

- समीर देशपांडे कोल्हापूर : महापालिका, नगरपंचायत, ग्रामपंचायतींमधून तुम्ही कोरोना पॉझिटिव्ह आहात म्हणून तुम्हाला फोन येतो आणि घरातील वातावरण बदलून जाते. काही सुचत नाही. घरातील अन्य सदस्यही हबकलेलेच असतात. मग गोंधळून न जाता रुग्णालयात दाखल होताना काय साहित्य घ्यायचे आहे याचा विचार करा आणि ते सोबत घ्या; अन्यथा नंतर इतरांना धावपळ करावी लागते.तुमच्या स्वॅबचा अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर अर्ध्या तासातच तुमच्या गल्लीत यंत्रणा दाखल होते. फवारणी सुरू होते. पीपीई किट

घातलेले कर्मचारी चौकशी सुरू करतात. गल्लीत नागरिक हे सर्व पाहत असतात; परंतु याच तणावात आपल्याला लागणाऱ्या वस्तू आठवणीने रुग्णाच्या घरातील सदस्यांनी देण्याची गरज असते. घरातील इतरांना तातडीने स्राव देण्यासाठी नेण्याचा आग्रह सुरू होतो. त्यामुळे अन्य सदस्यही भांबावून जातात. म्हणूनच रुग्णवाहिका येण्याआधी आवश्यक साहित्य घेण्याची गरज असते.

पॉझिटिव्ह रुग्णाने हे घ्यावे

ब्रश, पेस्ट, दंतमंजन - दहा-बारा दिवसांसाठी लागणारे कपडे - एखादे बेडशीट, चादर -काही औषधे सुरू असतील तर ती घ्यावीत -अंघोळीचा, कपडे धुण्याचा साबण, तेल, कंगवा - गरम पाण्यासाठी इलेक्ट्रिक किटली किंवा थर्मास - काही फळे, बिस्किट - सॅनिटायझर, मास्क आणि ग्लोव्हज

प्रशासनाने ही माहिती द्यावी

प्रशासनाकडून आलेल्या कर्मचाऱ्यांनी शांतपणे रुग्ण आणि नातेवाइकांना काय बरोबर घ्यावे, किती दिवस राहावे लागेल याची थोडक्यात माहिती देण्याची गरज आहे. ही माहिती दिल्यास ते रुग्ण आणि नातेवाइकांसाठी सोयीचे होणार आहे.

रुग्णाच्या घरातील सदस्यांसाठी आवश्यक

संस्थात्मक अलगीकरणात किमान आठ-दहा दिवस राहावे लागते. अहवाल निगेटिव्ह आल्यास स्थानिक प्रभाग समितीच्या पत्रानुसार हॉटेलमध्येही राहता येते. घरी राहण्यासाठी निगेटिव्ह आल्याची प्रत व समितीच्या सचिवांच्या पत्राची गरज असते.

मोबाईलवर बोलत बसू नका, सकारात्मक राहा

आपण पुन्हा निगेटिव्ह येण्यासाठी तुमची तब्येत महत्त्वाची असल्याने शांत झोप आवश्यक आहे. म्हणून मोबाईल सायलेंट करून शांतपणे अधिकाधिक झोप घेण्याचा प्रयत्न करा. घरचा डबा देताना अनेकदा पथ्य पाळले जात नाही. तेथे तुम्हाला दिलेले जेवण हे पुरेसे असते. तेच अन्न खा.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसkolhapurकोल्हापूर