अनधिकृत बांधकामांवर त्वरित कारवाई करा

By Admin | Updated: November 10, 2014 23:57 IST2014-11-10T23:39:46+5:302014-11-10T23:57:11+5:30

शिवसेनेचे निवेदन : आयुक्तांकडे मागणी

Take immediate action on unauthorized constructions | अनधिकृत बांधकामांवर त्वरित कारवाई करा

अनधिकृत बांधकामांवर त्वरित कारवाई करा

कोल्हापूर : शहरातील पार्किंगचा प्रश्न बिकट बनत चालला असल्याने अनधिकृत बांधकामांवर महानगरपालिकेने तातडीने कारवाई करावी, अन्यथा न्यायालयाचे दरवाजे ठोठवावे लागतील, असा इशारा शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पवार यांनी आयुक्त विजयालक्ष्मी बिदरी यांना निवेदनाद्वारे दिला आहे.
शहरात अनेक मंगल कार्यालये, दवाखाने, कमर्शियल कॉम्लेक्समध्ये पार्किंगच्या जागेत अनधिकृत बांधकामे करून अन्य व्यवसाय सुरू करण्यात आले आहेत. त्यामुळे अशा बांधकामांमुळे पन्नास टक्के पार्किंगच्या समस्या उद्भवलेल्या आहेत. नुकताच महापालिकेच्या एका अधिकाऱ्याने विकेश अभयकुमार ओसवाल यांच्याविरोधात जुना राजवाडा पोलीस ठाण्यात महाराष्ट्र प्रादेशिक नगररचना अधिनियमातील कलमानुसार गुन्हा नोंद केला आहे. गुन्हा दाखल झाला असला तरी त्यांनी केलेले अनधिकृत बांधकाम कोणी पाडायचे, हा प्रश्न निर्माण झाला आहे.
त्यामुळे यासंदर्भातील जबाबदारी निश्चित करून तातडीने बांधकाम पाडावे, त्याचबरोबर अशा अनेक बांधकाम व्यावसायिकांनी पैशासमोर कायदा पायदळी तुडवीत बांधकामे केली आहेत त्यांच्यावरही कारवाई करावी, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.

Web Title: Take immediate action on unauthorized constructions

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.