वडगावातील दहा युवकांचा आदर्श घ्या : माने
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 1, 2021 04:17 IST2021-07-01T04:17:10+5:302021-07-01T04:17:10+5:30
येथील शेतकरी मंगल कार्यालयात छत्रपती शिवाजी महाराज आरोग्य मंदिराने महिन्याभर सेवा दिली होती. त्यानंतर जागेअभावी बंद ठेवण्यात आले. नागरिकांनी ...

वडगावातील दहा युवकांचा आदर्श घ्या : माने
येथील शेतकरी मंगल कार्यालयात छत्रपती शिवाजी महाराज आरोग्य मंदिराने महिन्याभर सेवा दिली होती. त्यानंतर जागेअभावी बंद ठेवण्यात आले. नागरिकांनी दातृत्व तर त्या दहा युवकांचे प्रत्यक्ष काम या सदिच्छांच्या जोरावर या आरोग्य मंदिरातून ९७ रुग्ण उपचारानंतर घरी परतले होते. या समारोप प्रसंगी माने बोलत होते.
दरम्यान भूषण विभुते, सचिन सागर, महेश भोपळे, विजय माने, विजयसिंह शिंदे, पवन पोवार, नितीन कुचेकर, राज कोळी, पीयूष सावर्डेकर, संजय कोठावळे यांनी कोविड केअर सेंटर सुरू ठेवण्यासाठी पुढाकार घेतला होता.
नगराध्यक्ष मोहनलाल माळी म्हणाले, कोरोनाबाधिताची सेवा या आरोग्य मंदिरात केली. कोरोना योद्ध्यांनी आटोक्यात आणण्यासाठी योगदान दिले होते. दुसऱ्या लाटेत जिल्हा परिषदेने मदत नाकारली. त्यामुळे मदतीअभावी कोविड सेंटर सुरू करून शकलो नाही. पण या कोरोना योद्ध्यांनी गटतट सोडून काम केले आहे.
प्रास्ताविक सचिन सलगर यांनी केले. आभार भूषण विभूते यांनी मानले. यावेळी डॉ. आर. ए. पाटील, डाॅ. अजिंक्य हाके यांच्यासह वैद्यकीय सेवा देणाऱ्या कोरोना योद्ध्यांचा सत्कार करण्यात आला.
फोटो कॅप्शन: पेठवडगाव : येथे मोफत छत्रपती शिवाजी महाराज आरोग्य मंदिराच्या समारोप प्रसंगी बोलताना जिल्हा परिषद सदस्य अशोकराव माने, शेजारी नगराध्यक्ष मोहनलाल माळी, रमेश शिंपणेकर, संजय सूर्यवंशी आदी उपस्थित होते.