शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

आला हिवाळा, त्वचा सांभाळा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 7, 2021 19:24 IST

सद्या वातावरणात मोठे बदल होत आहेत. दिवसा कडक ऊन आणि रात्री थंडी असे वातावरण आहे. त्यामुळे त्वचेच्या विविध समस्या निर्माण होत आहेत.

संतोष मिठारीकोल्हापूर : सध्या हिवाळ्यामध्ये काही दिवस पावसाने हजेरी लावली आहे. मात्र, इतरवेळी दिवसा कडक ऊन आणि रात्री थंडी असे वातावरण आहे. त्यामुळे त्वचेच्या विविध समस्या निर्माण होतात. त्यात थंडीमुळे त्वचा कोरडी पडणे, फुटणे आदींचा समावेश आहे. त्यामुळे पुरेसे पाणी, आहार, झोप घेणे आवश्यक आहे. मॉश्चरायझर, विंटरकेअर लोशन वापरणे महत्त्वाचे ठरणारे आहे.त्वचा फुटतेय, कोरडी पडतेय?- थंडीच्या दिवसात त्वचेमधील तैलग्रंथी निष्क्रिय होतात. त्यामुळे त्वचा कोरडी, निस्तेज पडते.- त्वचा फुटणे, ओळ फुटणे आणि चेहऱ्यावर सुरकुत्या पडणे अशा समस्या निर्माण होतात.- त्वचा फुटणे अथवा कोरडी पडणे हे त्रासदायक ठरते. हे टाळण्यासाठी विशेष काळजी घेणे आवश्यक आहे.

कोमट पाण्याने चेहरा वारंवार धुवावा- अंघोळीसाठी एकदम कडक पाणी घेणे टाळावे. कोमट पाणी वापरावे.- थंडी असताना जर बाहेर पडायचे असल्यास चांगले मॉश्चरायझर, विंटरकेअर लोशनचा वापर करावा.- त्वचा स्निग्ध, कांतिमय ठेवण्याकरिता आहारामध्ये मोसंबी, पालेभाज्य, हिरव्या भाज्या, सलाडचे प्रमाण वाढवावे.- रात्री झोपण्यापूर्वी दुधाची साय अथवा तुपामध्ये चंदन मिसळून मॉलिश केल्यास त्वचेचे तेज कायम राखता येते.- अंघोळ झाल्यानंतर क्रीमऐवजी खोबरेल तेल, तिळाचे तेल, तूप, दुधाची साय यांचा वापर करावा.

त्वचारोग तज्ज्ञ म्हणतातत्वचा कोरडी होणे टाळायचे असल्यास शक्यतो साबणाचा वापर टाळावा. खोबरेल तेलाने सर्व शरीराला मॉलिश करावे. त्यामुळे रक्तप्रवाह योग्य राहून त्वचेला तेज येते. एक चमचा मध, दोन चमचे दूधपावडर, दोन चमचे कोरफडीचा गर असा आयुर्वेदिक फेसपॅक वापरता येईल. कोमट पाण्याने चेहरा धुवावा. जेवणात बदाम अथवा बदामाचे दूध, पनीर, स्निग्ध पदार्थ असावेत. पुरेसे पाणी प्यावे.  -डॉ. श्रीकांत नागावकर

 

योग्य आहार, पुरेशी झोप घ्यावी. थंडीत बरे वाटते म्हणून आपण कडक पाणी अंघोळीसाठी घेतो. मात्र, त्याचा त्वचेला फटका बसतो. त्यामुळे अंघोळीसाठी कोमट पाणी वापरावे. सौम्य साबणाचा वापर करता येईल. थंडीमध्ये नियमितपणे मॉश्चरायझर, विंटरकेअर लोशनचा वापर करावा. पाणी पिण्याचे प्रमाण कमी करू नका.  -डॉ. सुदर्शन गौरकर

टॅग्स :kolhapurकोल्हापूरWinter Care Tipsथंडीत त्वचेची काळजीSkin Care Tipsत्वचेची काळजी