संचारबंदीचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2021 04:22 IST2021-04-18T04:22:35+5:302021-04-18T04:22:35+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क बांबवडे : बांबवडे येथे संचारबंदीचे उल्लंघन करणाऱ्यांवर दंडात्मक व कायदेशीर कारवाई करा अशा सूचना गटविकास अधिकारी ...

संचारबंदीचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई करा
लोकमत न्यूज नेटवर्क
बांबवडे : बांबवडे येथे संचारबंदीचे उल्लंघन करणाऱ्यांवर दंडात्मक व कायदेशीर कारवाई करा अशा सूचना गटविकास अधिकारी अनिल वाघमारे यांनी दिल्या.
बांबवडे येथील केंद्रीय प्राथमिक शाळेत कोरोना संसर्गाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या संदर्भात आयोजित बैठकीत ते बोलत होते. यावेळी पोलीस निरीक्षक विजय पाटील ,जि प सदस्य विजय बोरगे उपस्थित होते.
या बैठकीत बांबवडे येथे विनाकारण फिरणारे, मास्क न वापरणारे व संचार बंदीचे उल्लंघन करणाऱ्यांची संख्या जास्त आहे. त्यांच्यावर नियंत्रण ठेवण्याच्या सूचना पोलीस प्रशासन व कोरोना समितीला देण्यात आल्या.
यावेळी तालुका वैद्यकीय अधिकारी एच. आर. निरंकारी, , शिक्षण विस्तार अधिकारी नंदकुमार शेळके, सरपंच सागर कांबळे, उपसरपंच सयाजी निकम, विष्णू यादव ,अभयसिंग चौगुले, व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष बाळासाहेब खुटाळे, उपाध्यक्ष दत्तात्रय शेळके, सचिव दत्तात्रय यादव, ग्रामसेवक जी. एस. कमलाकर, पोलीस पाटील संजय कांबळे आदी उपस्थित होते.