शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ला: मृतांच्या कुटुंबीयांना ५ लाख रुपयांची मदत देणार; CM देवेंद्र फडणवीसांची घोषणा
2
पहलगाम हल्ला: “मागच्याला गोळी घातली, मी कलमा वाचला अन् वाचलो”; प्रोफेसरांनी सांगितली आपबीती
3
पहलगाम हल्ल्याचा हिशोब होणार! राजनाथ सिंह यांची दिल्लीत उच्चस्तरीय बैठक; तिन्ही दलांच्या प्रमुखांची उपस्थिती
4
देशातील मुस्लिमांना दाबले जाते, म्हणून पहलगाम हल्ला झाला; रॉबर्ड वाड्रांचे धक्कादायक वक्तव्य
5
Pahalgam Attack: दहशतवादी हल्ल्यानंतर शाहरुख हळहळला, भाईजान म्हणाला- "स्वर्गासारखं काश्मीर नरकात बदलत आहे..."
6
ट्रम्प टॅरिफची दहशत संपली? निफ्टी ४ महिन्यांच्या शिखरावर, आयटीमध्येही तेजी परतली
7
Pahalgam Attack Update : हृदयद्रावक! साता जन्माची साथ ७ दिवसांत सुटली; रडली, शवपेटीला मिठी मारली, सॅल्यूट करुन म्हणाली...
8
दहशतवादी हल्ल्यानंतर भारताकडून कारवाईची भीती, पाकिस्तानचा शेअर बाजार आपटला
9
Marriage Ritual: लग्नांनंतर वर्षभर उलटे मंगळसूत्र घालण्यामागे काय आहे कारण? जाणून घ्या!
10
हे पहिल्यांदाच घडलं.. गौतम अदानींचा 'या' व्यवसायातून काढता पाय; सुनील मित्तल यांना विकण्याची तयारी
11
Post Office ची 'ही' स्कीम करणार तुमचे पैसे डबल, जाणून घ्या संपूर्ण डिटेल्स
12
महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटक...पहलगाम हल्ल्यात कोणत्या राज्यातील किती पर्यटकांचा मृत्यू? पाहा यादी
13
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारत मोठी कारवाई करणार; 'हे' 4 संकेत काय सांगतात..?
14
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर 'या' बँकेचे शेअर्स विकण्यासाठी रांग, ९% टक्क्यांपेक्षा जास्त आपटला
15
पहलगाम हल्ला: दहशतवाद्यांनी मुस्लीम तरुणाचीही केली हत्या; कुटुंबाचा टाहो, म्हणाले, 'आम्हाला न्याय हवा'
16
पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर काश्मीरमधून पहिल्यांदाच उमटल्या अशा प्रतिक्रिया, दिसल्या या चार गोष्टी    
17
ऑटो कंपोनट निर्माता कंपनीची वर्षात ५१,५३० टक्के वाढ; प्रत्येक शेअरवर मिळणार ६० रुपयांचा लाभांश
18
भोपाळ जवळ GAIL प्लांटमध्ये मिथेन गॅस गळती; परिसरात भीतीचे वातावरण
19
बाळाला खाली ठेवायला लावले आणि तीन मिनिटे चालवल्या गोळ्या; भरत भूषण यांच्या सासूने सांगितली आपबिती
20
स्वामी समर्थ स्मरण दिन: ३ दिवस सेवा करा, असीम कृपेचे धनी व्हा; शुभ घडेल, अशक्यही शक्य होईल!

Kolhapur: शाहूवाडी तहसीलदारांवर लाचप्रकरणी कारवाई करा, आमदार प्रकाश सुर्वे यांची विधानसभेत लक्षवेधी 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 26, 2025 18:00 IST

जिल्ह्यातील एकाही आमदाराचे लक्ष नाही

कोल्हापूर : शाहूवाडी तहसील कार्यालयातील लाचखोरीवर मुंबईचे शिंदेसेनेचे आमदार प्रकाश सुर्वे यांनी मंगळवारी विधानसभेत लक्षवेधी ( क्रमांक २५३० मार्च २०२५) चर्चेची मागणी केली. तहसीलदार रामलिंग चव्हाण (मूळ रा. तुळशी ता.माढा., जि.सोलापूर) यांच्या नावे पाच लाखांची लाच स्वीकारताना पंटर सुरेश खोत याला अटक करण्यात आली. मात्र खोत याने ज्यांच्यासाठी लाचेची मागणी केली. त्यांच्यावर कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही.

यामुळे तहसीलदार चव्हाण यांच्यावर तातडीने कारवाई करण्याची आवश्यकता आहे. यासंबंधी शासनाने केलेली आणि करावयाच्या कारवाईसंबंधीची भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणी आमदार सुर्वे यांनी केली. अध्यक्षांनी ती मान्य केली आहे. त्या पार्श्वभूमीवर पुण्याच्या विभागीय आयुक्तांना यासंबंधीचा वस्तुस्थितीदर्शक अहवाल देण्याचा आदेश महसूल विभागाचे अवर सचिव प्रवीण पाटील यांनी दिला आहे.शाहूवाडी तालुक्यातील येळाणे येथील तक्रारदाराच्या जमिनीच्या सातबारा उताऱ्यावरील फेरफारमध्ये खाडाखोड करून चुकीच्या गटनंबरची नोंद केली. ती दुरूस्त करावी म्हणून तक्रारदाराने ६ फेब्रुवारी २०२३ रोजी तहसील कार्यालयात अर्ज केला होता. यासाठी ते वारंवार तहसीलदार रामलिंग चव्हाण यांच्याकडे जावून पाठपुरावा करत होते पण त्यांच्या कामात दिरंगाई होत राहिली.

शाहूवाडी तहसील कार्यालयात प्रलंबित असलेले सावे येथील गटनंबर ६१६ बाबतचे काम तहसीलदार चव्हाण यांच्याकडून पूर्ण करून देतो, त्यासाठी चव्हाण यांना देण्यासाठी पाच लाखांची मागणी पंटर सुरेश खोत यांनी तक्रारदार यांच्याकडून केली. ती स्वीकारताना खोत यांना लाचलुचपत प्रतिबंधक पथकाने १८ मार्च २०२५ रोजी पकडले. पण तहसीलदार चव्हाण यांच्यावर कारवाई झाली नाही, याकडेच आमदार सुर्वे यांनी लक्ष वेधले.

आमदार सुर्वे यांच्या लक्षवेधीत म्हटले आहे, तक्रारदार यांचे मामेभाऊ यांच्यासह सहहिस्सेदार यांच्या अर्जावर सुनावणी सुरू होती. त्यावेळी शाहूवाडी तहसीलदारांचे दलाल सुरेश खोत यांनी तक्रारदार यांची भेट घेऊन तुमचे प्रलंबित काम पूर्ण करून देतो असे सांगून ५ लाखांची मागणी केली. तक्रारदारांकडून पाच लाखांची लाच घेताना पंटर खोत यांना अटक केली. या प्रकरणात तहसीलदार चव्हाण यांच्यावरही कारवाई करावी.

जिल्ह्यातील एकाही आमदाराचे लक्ष नाहीशाहूवाडी तहसीलमधील पाच लाखांचे प्रकरण जिल्ह्यासह राज्यात गाजत आहे. लाचखोरीचा सर्वाधिक त्रास शाहूवाडी तालुक्यातील सामान्य जनतेला होत आहे. यामुळे या प्रकरणाकडे शाहूवाडीचे आमदार विनय कोरे यांच्यासह जिल्ह्यातील इतर आमदारांनी लक्ष वेधणे अपेक्षित होते. पण, जिल्ह्यातील एकाही आमदाराने प्रश्न उपस्थित केलेला नाही. उलट मुंबईतील मागाठणे मतदारसंघातील प्रकाश सुर्वे यांनी याकडे लक्ष वेधून शाहूवाडी महसूलमधील भ्रष्ट कारभार चव्हाट्यावर आणला.

अनेक एजंट नेमून वसुली..शाहूवाडी तहसीलमध्ये एजंटतर्फे वसुली केली जात आहे. सामान्य जनता अशा तहसीलदारांच्या कारभाराने त्रस्त आहे, चव्हाण यांनी खोत यासारखे अनेक एजंट नेमून वसुली सुरू असल्याचे लक्षवेधी सूचनेच्या प्रस्तावात म्हटले आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरvidhan sabhaविधानसभाBribe Caseलाच प्रकरणshahuwadi-acशाहूवाडी