शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

मुजोर संस्थाचालकांवर कारवाई करा,सर्व शिक्षक कृती समितीचे मूक आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 2, 2021 17:44 IST

Teacher Kolhapur- रुईकर कॉलनीतील जय भारत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष परशुराम जाधव यांनी मद्यधुंद अवस्थेत डॉ. श्रीधर सावंत विद्यालयाचे मुख्याध्यापक संजय पाटील यांना अर्वाच्य भाषेत शिवीगाळ व धक्काबुक्की करून त्यांना जीवे मारण्याची धमकी दिली. याविरोधात शनिवारी सर्व शिक्षक आणि नागरी संघटना कृती समितीच्या वतीने संस्थेच्या समोर मूक धरणे आंदोलन केले.

ठळक मुद्देमुजोर संस्थाचालकांवर कारवाई करासर्व शिक्षक आणि नागरी संघटना कृती समितीचे मूक आंदोलन

कोल्हापूर : रुईकर कॉलनीतील जय भारत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष परशुराम जाधव यांनी मद्यधुंद अवस्थेत डॉ. श्रीधर सावंत विद्यालयाचे मुख्याध्यापक संजय पाटील यांना अर्वाच्य भाषेत शिवीगाळ व धक्काबुक्की करून त्यांना जीवे मारण्याची धमकी दिली. याविरोधात शनिवारी सर्व शिक्षक आणि नागरी संघटना कृती समितीच्या वतीने संस्थेच्या समोर मूक धरणे आंदोलन केले.संस्थाचालक जाधव हे शिक्षकांच्या पगारातून दरमहा एक दिवसाचा पगार कपात करणे, वरिष्ठ निवड, वेतन श्रेणी न देणे,, वेतन आयोगातील संपूर्ण फरक शिक्षकांच्या कडून काढून घेणे, शिक्षकांकडून घरची साफसफाई, स्वतःच्या पाहुण्यांची बडदास्त ठेवणे, महिला शिक्षकांना अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करणे, महिलांना टोमणे मारणे ,किरकोळ रजा, प्रसूती रजा न देणे, दिल्यास त्या दिवसाचा पगार शिक्षकांकडून रोख स्वरूपात काढून घेणे, असा प्रकार करतात. असा आरोप महिला शिक्षकांनी केला आहे. याविरोधात आज कोल्हापूर शहर आणि जिल्हा नागरी कृती समिती जिल्हा शैक्षणिक व्यासपीठ यांच्या संयुक्त विद्यमानाने संस्थेवर मूक मोर्चा काढण्यात आला.या आंदोलनात शैक्षणिक व्यासपीठाचे एस.डी .लाड, वसंतराव देशमुख,अशोक पोवार, रमेश मोरे, खाजगी शिक्षक संघटनेचे भरत रसाळे, संतोष आयरे, राजेंद्र कोरे,एम.डी.पाटील, आनंद हिरुगडे, अनिल सरक ,टी .आर .पाटील आदि शेकडो शिक्षक सहभागी झाले होते.दरम्यान शिक्षक आमदार जयंत आसगावकर यांनी संस्थेला भेट दिली. शिक्षकांचा संताप पाहून त्यांनी देखील संस्थाचालकांची कान उघडणी केली. मात्र, संस्थाचालकांनी जवळपास तासभर आमदारांना गेटवर ताटकळत ठेवले. त्यामुळे काही काळ तणाव निर्माण झाला होता. 

असा कोणताही प्रकार आमच्या शिक्षण संस्थेमध्ये घडला नाही. शिक्षण उपसंचालकांनी येऊन चौकशी करावी. जर चुकीचे घडले असेल तर ते कारवाई करावी- सुमित्रा जाधव ,संस्था पदाधिकारी

 

 

टॅग्स :Teacherशिक्षकkolhapurकोल्हापूर