शहरं
Join us  
Trending Stories
1
२७ टक्के ओबीसी आरक्षणासह नव्या प्रभाग रचनेनुसार निवडणुका; पालिका निवडणुकांबाबतच्या दोन याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या
2
महिलेचा दोन महिन्यांपूर्वी मृत्यू, मुलगा वापरत होता आईचं युपीआय अन् अचानक खात्यात आले अरबो रुपये!
3
आजचे राशीभविष्य, ०५ ऑगस्ट २०२५: अनपेक्षित यश, अडकलेले पैसे मिळतील; चौफेर लाभ
4
नोकरीत बिहारींचा पहिला हक्क; नवे ‘डोमिसाइल’ धोरण जाहीर
5
आरोप करणाऱ्या देशांनी आधी स्वतःकडे बघावे! ट्रम्पच्या टॅरिफ धमकीला सरकारचे थेट उत्तर
6
टॉयलेटमध्येही फोन वापरता? मग त्याला किती वेळा स्वच्छ ठेवता? धोका आधीच जाणून घ्या!
7
गरिबांसाठी भिडणाऱ्या, लढणाऱ्या नेत्याची एक्झिट, आदिवासींच्या हक्कांसाठी शिबू सोरेन यांनी दिला लढा
8
भारत अमेरिकेला फसवतोय, युक्रेन युद्धाला मदत करतोय
9
आम्ही दोघे भाऊ २० वर्षांनी एकत्र आलो, तुम्ही का भांडता? राज ठाकरेंनी पहिल्यांदा केले एकत्र येण्यावर भाष्य
10
‘चीन’वरून जुंपली : ‘गलवान’नंतर चीनबाबत सरकारने दिशाभूल केली, काँग्रेसचा हल्लाबोल
11
सच्चे भारतीय असाल, तर असे बोलणार नाहीत; राहुल गांधींना सुप्रीम कोर्टाने सुनावले; दिलासाही दिला
12
टीम इंडियाने दिला नवा मंत्र : BELIEVE...; भारताने ६ धावांनी मिळवलेल्या थरारक विजयाची कारणे, ६ प्रश्नांच्या उत्तरांमध्ये
13
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले
14
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
15
DSP सिराजचा ऑन ड्युटी फॉर्म्युला! सर्वाधिक विकेट्स अन् १००० पेक्षा अधिक चेंडू टाकण्याचा मोठा पराक्रम
16
धक्कादायक! नागपुरात भर रस्त्यावर महिला पोलिसाला मारहाण करत विनयभंग
17
मोबाईलसाठी रेल्वेतील प्रवाशाच्या हातावर फटका, तरुणाने गमावला पाय; २० हजार रुपयेही पळवले
18
Pahalgam Attack: ते दहशतवादी पाकिस्तानी असल्याचे लष्कराने म्हटले नाही; संरक्षण मंत्रालयाचा खुलासा
19
१२,००० सॅमसंग स्मार्टफोनने भरलेला ट्रक चोरीला गेला; चोरट्यांनी ९१ कोटींच्या वस्तू लंपास केल्या

अमली पदार्थाविरोधात कारवाई करा, शिवसेना उद्धव ठाकरे गटाची कोल्हापुरात निदर्शने

By संदीप आडनाईक | Updated: October 20, 2023 18:58 IST

कोल्हापूर : भविष्यामध्ये महाराष्ट्रासह कोल्हापूर नशेखोरांचं आणि अमली पदार्थाचे सध्या केंद्र बनतेय प्रशासनाने याविषयी योग्य ती खबरदारी त्वरित घ्यावी ...

कोल्हापूर : भविष्यामध्ये महाराष्ट्रासह कोल्हापूर नशेखोरांचं आणि अमली पदार्थाचे सध्या केंद्र बनतेय प्रशासनाने याविषयी योग्य ती खबरदारी त्वरित घ्यावी या मागणीसाठी शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शिवसेनेच्या उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातर्फे उपनेते तथा संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर आणि उपनेते, जिल्हाप्रमुख संजय पवार यांच्या नेतृत्वाखाली निदर्शने करण्यात आली.गोवा आणि कर्नाटकच्या हद्दीवर वसलेल्या कोल्हापुरातून अमली पदार्थाची सुलभ ने-आण, वाहतूक मोठ्या प्रमाणावर चालू आहे. याविरोधात कारवाई करण्याची रेखावार यांच्याकडे मागणी अरुण दुधवडकर आणि संजय पवार यांनी केली. यावेळी सरकारच्या विरोधात कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी केली. दूधवडकर म्हणाले, व्यसनमुक्ती केंद्रासारख्या ठिकाणी सुद्धा अंमली पदार्थ सापडत आहे, हे अत्यंत धोक्याचे आहे. दरवेळेला प्रशासनानं अमली पदार्थ व अवैध धंद्याच्या विरुद्ध मोठ्या प्रमाणात मोहीम उघडायची आणि काही गोष्टी व्यवस्थित सुरळीत झाल्या की पुन्हा ते बंद करायचं, अमली पदार्थाचे सूत्रधार सुद्धा पोलिसांना माहित आहेत परंतु पोलीस त्यांना सुरक्षितपणे त्यांचं रक्षण करायचं काम करतात का ? असा प्रश्न त्यांनी केला. 

संजय पवार म्हणाले, लढवय्या असणारी उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना कोल्हापूरचा थोर विचाराची सामाजिक पार्श्वभूमीवर आज छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती शाहू महाराज यांच्या या वीर व थोर भूमीला अंमली पदार्थाचे केंद्र बनू देणार नाही.  प्रशासनाने योग्य ती खबरदारी घेऊन मोठ्या प्रमाणात कोंबिंग ऑपरेशन राबवत नशेखोरांना व आमली पदार्थाच्या सर्व ज्ञात असणाऱ्या ठिकाणावरती छापे मारून हे अमली पदार्थ व त्या सूत्रधारांना त्वरित अटक करावे अन्यथा शिवसेना आपल्या पद्धतीने तीव्र आंदोलन करेल असा इशारा दिला. यावेळी विजय देवणे,सुनील शिंत्रे, मुरलीधर जाधव,सरदार तीप्पे, रविकिरण इंगवले, सुनील मोदी, सुरेश पोवार, रणधीर पाटील, सतीश पानारी, संभाजी भोकरे, अरुण अब्दागिरी, स्मिता सावंत, हर्षल सुर्वे, शशिकांत बिडकर, प्रेरणा बाकळे, रणजित आयरेकर, मंजित माने, विशाल देवकुळे, पोपट दांगट, उपस्थित होते.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरShiv Senaशिवसेनाagitationआंदोलन