जैन धर्माचा अवमान करणाऱ्या अनुप मंडलावर कारवाई करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2021 04:18 IST2021-06-05T04:18:38+5:302021-06-05T04:18:38+5:30

इचलकरंजी : अखिल भारतीय जैन समाज हा अहिंसा परमो धर्म, जगा व जगू द्या, असा संदेश जगाला देणारा धर्म ...

Take action against Anup Mandal for insulting Jainism | जैन धर्माचा अवमान करणाऱ्या अनुप मंडलावर कारवाई करा

जैन धर्माचा अवमान करणाऱ्या अनुप मंडलावर कारवाई करा

इचलकरंजी : अखिल भारतीय जैन समाज हा अहिंसा परमो धर्म, जगा व जगू द्या, असा संदेश जगाला देणारा धर्म आहे. अनेक काळापासून चालत आलेल्या धर्माने सर्व गोष्टी प्रमाणित केल्या आहेत. मात्र, अनुप मंडलाचे अनुयायी जैन धर्म व समाजावर आक्षेपार्ह आरोप करून समाजात द्वेष निर्माण करत आहेत. त्यामुळे अवमान करणाऱ्या या मंडलावर कडक कारवाई करावी, अशा मागणीचे निवेदन भाजपच्यावतीने प्रांताधिकारी डॉ. विकास खरात यांना देण्यात आले.

निवेदनात, या मंडलाकडून मारण्याच्या व मंदिरे तोडण्याच्या धमक्या येत आहेत. जैन धर्माविरुद्ध आक्षेपार्ह गोष्टी बोलणाऱ्या आणि साधूंची हत्या करणाऱ्या मंडलावर सार्वजनिक बंदी घालण्यात यावी, तसेच त्यांच्यावर अदखलपात्र गुन्हा नोंद करावा, असे म्हटले आहे. शिष्टमंडळात शहर अध्यक्ष अनिल डाळ्या, वृषभ जैन, कुलदीप जैन, दीपक पाटील, दिलीप मुथा, आदींचा समावेश होता.

फोटो ओळी

०६०४२०२१-आयसीएच-०५

जैन धर्माचा अपमान करणाऱ्या अनुप मंडलावर कारवाई करावी, अशा मागणीचे निवेदन भाजपच्यावतीने प्रांताधिकारी डॉ. विकास खरात यांना देण्यात आले.

Web Title: Take action against Anup Mandal for insulting Jainism