शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

exam: पुनर्परीक्षा घ्या, शिवाजी विद्यापीठाच्या प्रवेशद्वारावर 'अभाविप'चे ठिय्या आंदोलन

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 21, 2022 12:01 IST

संगणक प्रणालीतील त्रुटींमुळे अनेक विद्यार्थ्यांना ऑनलाइन परीक्षा देता आली नाही.

कोल्हापूर : संगणक प्रणालीतील त्रुटींमुळे अनेक विद्यार्थ्यांना ऑनलाइनपरीक्षा देता आली नाही. त्यामुळे विद्यापीठाने या विद्यार्थ्यांसाठी पुनर्परीक्षा घ्यावी, या मागणीसाठी अखिल भारतीय विद्यार्थी परिषद (अभाविप) आक्रमक झाली. या परिषदेच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी विद्यापीठाच्या मुख्य प्रवेशद्वारात आज, सोमवारी ठिय्या आंदोलन केले. विद्यापीठ प्रशासनाने परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे प्रभारी संचालकांची हकालपट्टी करावी, अशी मागणीही या आंदोलनकर्त्यांनी केली.विद्यापीठाच्या मुख्य इमारतीच्या प्रवेशद्वारात सकाळी अकराच्या सुमारास आंदोलनकर्ते विद्यार्थी पोहोचले. त्यांना सुरक्षारक्षक आणि पोलिसांनी प्रवेशद्वारात थांबविले. त्यावर या आंदोलकांनी त्या ठिकाणी ठिय्या मारत मागण्यांच्या अनुषंगाने घोषणा देत परिसर दणाणून सोडला.दरम्यान संगणक प्रणालीतील या त्रुटींमुळे आणि त्याकडे विद्यापीठ प्रशासन आणि परीक्षा मंडळाचे प्रभारी संचालक यांनी केलेल्या दुर्लक्षाचा फटका अनेक विद्यार्थ्यांना बसला आहे. त्यामुळे या विद्यार्थ्यांना न्याय मिळावा यासाठी प्रभावीपणे अभाविपने पुनर्परीक्षा घेण्याची मागणी केली आहे. परीक्षेतील तांत्रिक अडचणी कडे दुर्लक्ष करणाऱ्या प्रभारी परीक्षा संचालकांचा राजीनामा घेवून विद्यापीठ प्रशासनाने त्यांची हकालपट्टी करावी,  अशी आमची मागणी आहे.त्याबाबतचे निवेदन विद्यापीठ प्रशासनाला दिले आहे. विद्यार्थ्यांना न्याय मिळेपर्यंत आमचा लढा सुरू राहणार असल्याचे विशाल जोशी यांनी सांगितले.या आंदोलनात विशाल जोशी, अमोल कुलकर्णी, दिनेश हुमनाबादे, गौरव  ससे, मेघा शिरगावे, सानिका पाटील, आदी सहभागी झाले.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरexamपरीक्षाonlineऑनलाइनcorona virusकोरोना वायरस बातम्या