तायक्वांदोत कोल्हापूरचे वर्चस्व
By Admin | Updated: December 10, 2015 01:15 IST2015-12-10T01:15:45+5:302015-12-10T01:15:45+5:30
विभागीय ग्रामीण स्पर्धा : १३ संघांचा सहभाग; राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड

तायक्वांदोत कोल्हापूरचे वर्चस्व
कनेडी (सिंधुदुर्ग) : महाराष्ट्र राज्य क्रीडा व युवक संचनालय पुणे, जिल्हा क्रीडा परिषद सिंधुदुर्ग, तायक्वांदो असोसिएशन आॅफ सिंधुदुर्ग आणि कनेडी गटशिक्षण प्रसारक मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने घेण्यात आलेल्या विभागीय ग्रामीण तायक्वांदो स्पर्धेत कोल्हापूर जिल्ह्यातील खेळाडंूनी वर्चस्व मिळविले आहे.स्पर्धेचे उद्घाटन प्रशालेचे चेअरमन एल. डी. सावंत यांच्या हस्ते करण्यात आले. कनेडी महाविद्यालयाच्या ज्ञानदीप सांस्कृतिक हॉलमध्ये झालेल्या या स्पर्धेत रत्नागिरी, सांगली, सातारा, कोल्हापूर, सिंधुदुर्ग जिल्ह्यांतील १३ संघांनी सहभाग नोंदविला होता. या स्पर्धेत सुवर्णपदक मिळविलेले खेळाडू राज्यस्तरीय ग्रामीण स्पर्धेत कोल्हापूर विभागाचे प्रतिनिधित्व करणार आहेत. या स्पर्धेच्या वेळी सहायक क्रीडा अधिकारी स्नेहल जगताप, शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य नाना सावंत, पर्यवेक्षक आर. एच. सावंत, जिल्हा तायक्वांदो असोसिएशनचे सचिव भालचंद्र कुलकर्णी, विनायक सापळे, क्रीडा समन्वयक बयाजी बुराण उपस्थित होते. पंच म्हणून एकनाथ धनवटे, उमाजी पोवार, अजय निगडेकर, विजय जावीर, अक्षय कुलकर्णी, संदेश परब, पूजा वाळके, नितीन तावडे यांनी काम पाहिले. या स्पर्धेतील सुवर्ण, रौप्य, कांस्यपदक विजेते पुढीलप्रमाणे- १६ वर्षांखालील मुले- वजनगट ४८ किलो- राहुल साबळे (कोल्हापूर), सूरज माने (सातारा), प्रथमेश गवळी (सांगली). वजनगट ५१ किलो-नागराज चौगुले (सिंधुदुर्ग), सौरभ पाटील (कोल्हापूर), प्रतीक सावंत (सांगली) व अभिषेक लकड े(सातारा). वजनगट ५५ किलो- प्रथमेश चव्हाण (रत्नागिरी), स्वप्निल तावडे (सिंधुुदुर्ग), सोमेश इंगवले (सांगली), शुभम पाटील (कोल्हापूर). वजनगट ५९ - ऋषिकेश पाटील (कोल्हापूर), चेतन पवार (रत्नागिरी), स्वप्निल देशमुख (सांगली) व जय जाधव (सातारा). वजनगट - ६३ किलो - राघव पटेल (रत्नागिरी), दिग्विजय पाटील (कोल्हापूर), नीलेश पाटील (सांगली) व अविष्कार माने (सातारा). वजनगट ६८ किलो- सूरज कांबळे (कोल्हापूर), ऋषिकेश गणाधारी (सांगली). वजनगट ७३ किलो- रोहित गडदे (सांगली), प्रतीक निरबोळे (कोल्हापूर). वजनगट ७३ किलो- इंद्रजित गायकवाड (सांगली).
मुली - वजनीगट ४४ किलो- सृष्टी डोंगरे (कोल्हापूर), आरती तिबे (सांगली), दीक्षिता राऊत (सिंधुदुर्ग) व श्वेता जाधव (सातारा). वजन गट ४७ किलो - सिद्धी निकम (कोल्हापूर), वैष्णवी साळुंखे (सांगली), दिव्या पेडणेकर (सिंधुदुर्ग) व प्रतीक्षा चव्हाण (रत्नागिरी), वजनगट ५१ किलो - कोमल पोवार (कोल्हापूर), सायली जाधव (सातारा), अंकिता वाघमारे (सांगली) व अश्विनी कोकम (सिंधुदुर्ग). वजनगट ५५ किलो - कोमल घराळ (कोल्हापूर), नायला नाईक (सिंधुदुर्ग). वजनगट ५५ किलोवरील - धनश्री घराळ (कोल्हापूर), अंकिता जाधव (सातारा), अंकिता कागवडे (सांगली) यांनी यश मिळविले. (वार्ताहर)