प्रणालीने बनविले इको-फ्रेंडली गणपती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2021 04:28 IST2021-09-12T04:28:11+5:302021-09-12T04:28:11+5:30

रूकडी माणगाव : माणगाव येथील प्रणाली विनायक बन्ने हिने इको-फ्रेंडली गणेशमूर्ती बनविली आहे. तिने साकारलेली आकर्षक गणेशमूर्ती परिसरात चर्चेत ...

The system made eco-friendly Ganpati | प्रणालीने बनविले इको-फ्रेंडली गणपती

प्रणालीने बनविले इको-फ्रेंडली गणपती

रूकडी माणगाव : माणगाव येथील प्रणाली विनायक बन्ने हिने इको-फ्रेंडली गणेशमूर्ती बनविली आहे. तिने साकारलेली आकर्षक गणेशमूर्ती परिसरात चर्चेत असून, या मूर्तीमुळे प्रदूषण कमी होण्यास मदत होणार आहे.

प्रणाली ही बी. फार्मसीमध्ये शिकत असून, तिला लहानपणापासून चित्रकलेची आवड आहे. तिने घरात भिंतीवर विविध चित्रे रेखाटून कला जोपासली आहे. प्रणालीने इको-फ्रेंडली गणरायासाठी हळद व मैदाचे मिश्रण करून गणरायासह, मोदक, वाहक मूषक बनविले असून, यासाठी तिने दोनशे ग्रॅम हळद व मैदा वापरला आहे.

वाढते प्रदूषण, मातीचा अतिवापर आणि निसर्गाची हानी थांबविणे आवश्यक असल्याने अशी मूर्ती साकारण्याची कल्पना सुचली.

हळदीपासून तयार केलेली मूर्ती लगेच विरघळत असल्याने पावित्रही जपले जाते. शिवाय वृक्षाखाली मूर्ती विसर्जित केल्यास हळदीमुळे वृक्षांना कीड अथवा वृक्षावर रोगांचा प्रादुर्भाव ही कमी होत असल्याचे प्रणालीने सांगितले.

फोटो ११ माणगाव गणेशमूर्ती

माणगाव येथील प्रणाली बन्ने हिने हळदीपासून बनविलेली इको-फ्रेंडली गणेशमूर्ती.

Web Title: The system made eco-friendly Ganpati