पूर्ववैमनस्यातून तलवार हल्ला : एकजण जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 15, 2021 04:20 IST2021-01-15T04:20:04+5:302021-01-15T04:20:04+5:30
या प्रकरणी गुन्हा दाखल झालेल्यांमध्ये संशयित महेश माने, वैभव माने, किशोर शिंदे, पांडुरंग जोंधळे व बबलू पोवार या संशयितांचा ...

पूर्ववैमनस्यातून तलवार हल्ला : एकजण जखमी
या प्रकरणी गुन्हा दाखल झालेल्यांमध्ये संशयित महेश माने, वैभव माने, किशोर शिंदे, पांडुरंग जोंधळे व बबलू पोवार या संशयितांचा समावेश आहे.
पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, रमेश चांदणे हे कदमवाडी कपूर वसाहतीत राहतात. ते मंगळवारी (दि. १२) एकाच्या अंत्यविधीसाठी स्मशानभूमीत गेले होते. त्यावेळी एकमेकांकडे बघण्याच्या कारणावरून बाचाबाची झाली होती. त्यानंतर बुधवारी दुपारी संशयित महेश, वैभव माने, किशोर शिंदे, पांडुरंग जोंधळे, बबलू पोवार या पाचजणांनी मंगळवारी झालेल्या भांडणाच्या रागातून चांदणे यांच्यावर तलवार व काठ्यांनी हल्ला केला. यात चांदणे जखमी झाले. त्यांचा मामेभाऊ सत्यम सुखदेव फाळके हेही जखमी झाले. अचानक घडलेल्या या प्रकारामुळे परिसरात तणाव निर्माण झाला. पोलिसांनी घटनास्थळी वेळीच धाव घेऊन परिस्थिती नियंत्रणात आणली. जखमी चांदणे यांना सीपीआर रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. त्यांच्या फिर्यादीवरून पाचही संशयितांवर शाहूपुरी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला.