तलवार हल्ला; दोघांना अटक
By Admin | Updated: February 15, 2015 00:34 IST2015-02-15T00:34:38+5:302015-02-15T00:34:38+5:30
परस्परविरोधी फिर्यादी : आर्थिक वादातून हल्ला

तलवार हल्ला; दोघांना अटक
कोल्हापूर : लक्षतीर्थ वसाहत येथे तरुणावर केलेल्या तलवार हल्ल्याप्रकरणी लक्ष्मीपुरी पोलिसांनी शनिवारी दोघा तरुणांना अटक केली. निखिल शंकर पोवार (वय २४, रा. लक्षतीर्थ वसाहत) व प्रशांत सुभाष पाटील (२४, रा. राजोपाध्येनगर) अशी त्यांची नावे आहेत.
चिकनगाडीच्या आर्थिक देवाण-घेवाणीतून हल्ला केल्याची कबुली आरोपींनी दिल्याची माहिती पोलीस निरीक्षक धन्यकुमार गोडसे
यांनी दिली. या हल्ल्यामध्ये पवन बाळासो जगताप (वय ३२, रा. लक्षतीर्थ वसाहत) हा जखमी झाला. दरम्यान, याप्रकरणी दोन्ही बाजूंनी परस्पर विरोधी फिर्यादी दाखल केल्या आहेत. रात्री उशिरापर्यंत दुसऱ्या गुन्ह्यांतील आरोपींना अटक केली नव्हती.
याबाबत पोलिसांनी सांगितले, पवन जगताप व त्याचा भाऊ
अमृत (३५) हे दोघे सोनारकाम करतात. निखिल पोवार याच्यासोबत त्यांचा व्यवहार झाला होता. त्यामध्ये २५ हजार रुपयांचे नुकसान झाले म्हणून तो दोघा भावांकडे पैशाची मागणी करीत होता. शुक्रवारी रात्री पवन हा शाळेजवळ मित्रांसमवेत बोलत असताना त्याच्यावर तलवारीने हल्ला करण्यात आला. यावेळी
अमृत जगताप याने दिलेल्या फिर्यादीनुसार पोलिसांनी दोघांना अटक केली.
दरम्यान, प्रशांत पाटील याने आपण मित्र निखिल पवार याच्यासोबत बोलत थांबलो
असता अमृत जगताप याने शिवीगाळ करीत ‘तू माझे उसने घेतलेले पैसे का परत दिले नाहीस’ म्हणून
आम्हा दोघांना काठीने मारहाण केल्याची फिर्याद अमृत जगताप त्याचा भाऊ पवन व अर्जुन अशा तिघांच्या विरोधात दिली आहे. (प्रतिनिधी)