‘आयजीएम’मधील सफाई कर्मचाऱ्यांचे काम बंद आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 9, 2021 04:16 IST2021-07-09T04:16:23+5:302021-07-09T04:16:23+5:30

इचलकरंजी : येथील आयजीएम रुग्णालयात काम करणाऱ्या सफाई कर्मचाऱ्यांना एप्रिल महिन्याचा पगार द्यावा. तसेच हजेरी भरलेल्या दिवसांचे वेतन मिळावे, ...

Sweepers strike at IGM | ‘आयजीएम’मधील सफाई कर्मचाऱ्यांचे काम बंद आंदोलन

‘आयजीएम’मधील सफाई कर्मचाऱ्यांचे काम बंद आंदोलन

इचलकरंजी : येथील आयजीएम रुग्णालयात काम करणाऱ्या सफाई कर्मचाऱ्यांना एप्रिल महिन्याचा पगार द्यावा. तसेच हजेरी भरलेल्या दिवसांचे वेतन मिळावे, या मागणीसाठी कर्मचाऱ्यांनी गुरुवारी सकाळी काम बंद आंदोलन केले. त्यामुळे पुन्हा रुग्णालयात साचणाऱ्या कचऱ्यांवर आरोग्याचा प्रश्न उपस्थित होण्याची शक्यता आहे.

रुग्णालयाची इमारत व रुग्णसंख्या पाहता ७२ कर्मचाऱ्यांची आवश्यकता आहे. तरीही कोल्हापूरच्या कंपनीला येथील साफसफाईचा ठेका देऊन ३३ कर्मचाऱ्यांची भरती केली आहे. त्यामध्ये आठ पुरुष व २५ महिलांचा समावेश आहे. सकाळी कर्मचाऱ्यांची संख्या कमी असल्याने साप्ताहिक सुटीही घेतली जात नाही. त्यामुळे अधिक दिवस काम करून घेतले जाते. परंतु त्यांचे वेतन २६ दिवसांचेच काढले जात आहे. या निषेधार्थ सफाई कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन केले.

Web Title: Sweepers strike at IGM