फेरीवाल्यांसाठी उद्यापासून ‘स्वनिधी से समृद्धी’ शिबिर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2021 04:22 IST2021-08-01T04:22:46+5:302021-08-01T04:22:46+5:30
कोल्हापूर : शहरातील फेरीवाल्यांसाठी उद्यापासून (सोमवार) दि. ७ ऑगस्टपर्यंत ११ ते ३ या वेळेत ‘स्वनिधी से समृद्धी’ हे शिबिर ...

फेरीवाल्यांसाठी उद्यापासून ‘स्वनिधी से समृद्धी’ शिबिर
कोल्हापूर : शहरातील फेरीवाल्यांसाठी उद्यापासून (सोमवार) दि. ७ ऑगस्टपर्यंत ११ ते ३ या वेळेत ‘स्वनिधी से समृद्धी’ हे शिबिर होत आहे. महापालिकेच्या वतीने गांधी मैदान येथील बाळासाहेब खराडे हॉल येथे हे शिबिर होत आहे.
महानगरपालिका अंतर्गत केंद्र शासनपुरस्कृत पी. एम. स्वनिधी योजनेची अंमलबजावणी सुरू आहे. या योजनेंतर्गत शहरातील पथविक्रेत्यांना दहा हजार रुपयांपर्यंतचे कर्ज दिले जात आहे. शहरातील ४६६६ इतक्या फेरीवाल्यांनी याचा लाभ घेतला. योजनेचा पुढील टप्पा म्हणून स्वनिधी से समृद्धी हे शिबिर होत आहे. कर्ज प्राप्त झालेल्या लाभार्थींना व त्यांच्या कुटुंबीयांना पी. एम. जीवन ज्योती बीमा योजना, पी. एम. सुरक्षा बीमा योजना, पी. एम. जनधन योजना, पी. एम. श्रमयोगी मानधन, रजिस्ट्रेशन अंडर BOCW, वन नेशन वन रेशन कार्ड, पी. एम. मातृवंदना योजना, जननी सुरक्षा या शासकीय योजनांचा लाभ देण्यात येणार आहे.
योजनेचा लाभ देण्यासाठी कर्जप्राप्त पथविक्रेता व त्यांच्या कुटुंबांचे सामाजिक, आर्थिक माहिती संकलित केली जात आहे. प्रत्येक महिन्याच्या पहिल्या आठवड्यात शिबिर घेऊन लाभ पात्रतेप्रमाणे दिला जाणार आहे. स्वनिधी से समृद्धी शिबिराचा लाभ सर्व फेरीवाल्यांनी घ्यावा, असे आवाहन महानगरपालिकेच्या वतीने केले आहे.