नांदणीतील कन्या शाळेत 'स्वानंदी शिक्षण'
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2021 04:17 IST2021-06-26T04:17:31+5:302021-06-26T04:17:31+5:30
फिनलँड व दिल्ली शिक्षण मंडळाकडून हॅप्पीनेस क्लास हा उपक्रम राबविण्यात येत आहे, तर महाराष्ट्रात स्वानंदी शिक्षण उपक्रम सुरू आहे. ...

नांदणीतील कन्या शाळेत 'स्वानंदी शिक्षण'
फिनलँड व दिल्ली शिक्षण मंडळाकडून हॅप्पीनेस क्लास हा उपक्रम राबविण्यात येत आहे, तर महाराष्ट्रात स्वानंदी शिक्षण उपक्रम सुरू आहे. स्वानंदी शिक्षण सर्वच राज्यात सुरू करण्याची राज्य शासनाकडून तयारी सुरू आहे. या पार्श्वभूमीवर नांदणी (ता. शिरोळ) येथे कोल्हापूर जिल्ह्यात पहिल्याच शाळेत स्वानंदी शिक्षण सुरू केले आहे. शाळेतील नऊ शिक्षकांना याचे प्रशिक्षण दिले आहे.
यावेळी जि. प. सदस्य राजवर्धन नाईक-निंबाळकर, पं. स. सदस्या मीनाक्षी कुरडे, शिक्षणाधिकारी आशा उबाळे, जि. प. विस्तार अधिकारी जाधव, गटशिक्षणाधिकारी दीपक कामत, सरपंच तगारे, मुख्याध्यापक अविनाश कोडोले उपस्थित होते.
---------------------------
चौकट - वैविध्यपूर्ण शिक्षण
या उपक्रमातून मुलींचा सर्वांगीण विकास व्हावा, जीवनातील कौशल्य, वैश्विक नागरिक बनविणे, आनंदी कुटुंब, समाजाचे उद्दिष्ट, सर्व कौशल्य संतुलित विचार क्षमता असलेल्या गोष्टी, सजगता, सहकार्य, संवेदनशीलता, मूल्यांची जपणूक, संविधानातील मूल्ये अंगीकारणे, सक्षम नागरिक यासह विविध गोष्टी स्वानंदी शिक्षणात देण्यात येणार आहेत.