स्वाभिमानीची आजपासून पदयात्रा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2021 04:52 IST2021-09-02T04:52:05+5:302021-09-02T04:52:05+5:30
कोल्हापूर : पूरग्रस्तांना भरीव नुकसानभरपाई मिळावी, नियमित पीक कर्ज भरणाऱ्यांना त्वरित ५० हजारांचे अनुदान द्यावे, यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेची ...

स्वाभिमानीची आजपासून पदयात्रा
कोल्हापूर : पूरग्रस्तांना भरीव नुकसानभरपाई मिळावी, नियमित पीक कर्ज भरणाऱ्यांना त्वरित ५० हजारांचे अनुदान द्यावे, यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेची ‘आक्रोश पूरग्रस्तांचा, परिक्रमा पंचगंगेची’ या नावाने आज, गुरुवारपासून प्रयाग चिखली येथून पदयात्रेला सुरुवात होणार आहे. स्वाभिमानीचे माजी खासदार राजू शेट्टी यांच्या हस्ते सकाळी आठ वाजता दत्त मंदिरात अभिषेक होईल. त्यानंतर पदयात्रेला प्रारंभ होईल. पंचगंगा काठावरून पदयात्रा जावून ५ सप्टेंबरला नृसिंहवाडीत कार्यकर्त्यांसह जलसमाधी आंदोलन होणार आहे.
पदयात्रा प्रयाग चिखलीपासून आंबेवाडी, वडणगे, निगवे, भुये, शिये, शिरोली, हालोंडी, हेर्ले, चोकाक, रूकडी, चिंचवाड, वसगडे, पट्टणकोडोली, इंगळी, रुई, चंदूर, अब्दूललाट, हेरवाड, कुरुंदवाडातून जाऊन ५ सप्टेंबरला नृसिंहवाडीला पोहचेल. तेथे स्वाभिमानीचे पदाधिकारी, कार्यकर्त्यासह शेट्टी जलसमाधी आंदोलन करणार आहेत.
कोट
स्वाभिमानीच्या मागण्यासंबंधी चर्चेसाठी सरकारने संपर्क साधलेला नाही. त्यामुळे पदयात्रा नियोजनानुसार निघेलच. पोलिसांनी अडवण्याचा प्रयत्न केल्यास प्रयाग चिखलीत पंचगंगा नदीच्या संगमावर जलसमाधी आंदोलन होईल.
राजू शेट्टी, माजी खासदार