शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
4
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
5
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
6
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
7
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
8
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
9
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
10
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
11
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
12
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
13
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
14
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
15
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
16
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
17
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
18
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
19
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
20
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
Daily Top 2Weekly Top 5

स्वाभिमानीची सोमवारची ऊस परिषद ऑनलाईन : फेसबुकवरून होणार लाईव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 30, 2020 16:48 IST

Swabimani Shetkari Sanghatna, collcatoroffice, kolhapurnews, farmar स्वाभिमानी शेतकरी संघटनेची १९ वी ऊस परिषद सोमवारी (दि. २) जयसिंगपूर येथील कल्पवृक्ष गार्डन येथे दुपारी दोन वाजता ऑनलाईन पद्धतीने होणार आहे. जिल्हाधिकारी दौलत देसाई यांच्यासोबत झालेल्या बैठकीनंतर संघटनेने ही घोषणा केली.

ठळक मुद्देस्वाभिमानीची सोमवारची ऊस परिषद ऑनलाईन : फेसबुकवरून होणार लाईव्हजिल्हाधिकाऱ्यांच्या सोबतच्या बैठकीनंतर निर्णय

कोल्हापूर : स्वाभिमानी शेतकरी संघटनेची १९ वी ऊस परिषद सोमवारी (दि. २) जयसिंगपूर येथील कल्पवृक्ष गार्डन येथे दुपारी दोन वाजता ऑनलाईन पद्धतीने होणार आहे. जिल्हाधिकारी दौलत देसाई यांच्यासोबत झालेल्या बैठकीनंतर संघटनेने ही घोषणा केली.गेली १९ वर्षे स्वाभिमानीच्या ऊस परिषदेतच उसाचा दर निश्चित केला होतो. त्यानंतर आंदोलन पेटते आणि तोडगा काढून साखर कारखान्यांचा हंगाम सुरू होतो. ऊस परिषदेला हजारो शेतकरी जयसिंगपूरच्या विक्रमसिंह मैदानावर एकत्र येतात. त्यांच्या साक्षीने ऊसदराचा आकडा जाहीर केला जातो.

यंदा कोरोनाचे संकट असल्याने ऊस परिषद होणार की नाही, याबाबत साशंकता होती तरीही स्वाभिमानी सोमवारी ऊस परिषदेची घोषणा केली. कोरोनाचा संसर्ग होऊ नये, यासाठी ऊस परिषदेबाबत विचार करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी यांनी केले होते. त्यानुसार शुक्रवारी जिल्हाधिकारी दौलत देसाई यांच्या अध्यक्षतेखाली स्वाभिमानी च्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक झाली.

त्यामध्ये, शिवसेनेने आपला पारंपरिक दसरा मेळावा ऑनलाईन घेतला. त्याप्रमाणेच ऊस परिषद घ्यावी, असे जिल्हाधिकारी देसाई यांनी सुचविले. त्यानंतर स्वाभिमानीचे प्रदेशाध्यक्ष प्रा. जालंदर पाटील यांनी माजी खासदार राजू शेट्टी यांंच्याशी चर्चा केली आणि ऑनलाईन पद्धतीने परिषद घेण्याचे मान्य केले.

बैठकीला जिल्हा परिषदेचे माजी बांधकाम सभापती सावकर मादनाईक, संघटनेचे जिल्हाध्यक्ष जनार्दन पाटील, अजित पोवार, वैभव कांबळे, विक्रम पाटील, जयकुमार कोल्हे, सागर आडके, विठ्ठल मोरे, सचिन शिंदे, एम. के. नाळे आदी उपस्थित होते. 

टॅग्स :Swabimani Shetkari Sanghatnaस्वाभिमानी शेतकरी संघटनाcollectorजिल्हाधिकारीkolhapurकोल्हापूरFarmerशेतकरी