शहरं
Join us  
Trending Stories
1
‘सत्याचा मोर्चा’वरून आयोजकांवर गुन्हा दाखल; मनसेची पहिली प्रतिक्रिया आली, भाजपावर टीका
2
Raj Thackeray : "धर्माच्या नावावर लोकांना आंधळं केलं की..."; राज ठाकरेंची खास पोस्ट, रंगली जोरदार चर्चा
3
तुमच्या जुन्या बँक खात्यात पैसे विसरलात का? RBI ने सांगितला फक्त ३ स्टेप्सचा सोपा मार्ग
4
"लोकसंख्या धोरण लवकरात लवकर लागू करणे आवश्यक, तरच..."; RSS ची सरकारकडे मागणी, होसबळे म्हणाले...
5
नात्याला काळीमा ! दीराने वहिनीचे दोन्ही हात पकडून ठेवले अन् पतीने कापला गळा...
6
AUS vs IND 3rd T20I : संजू संघातून ‘आउट’; टॉसवेळी सूर्याचं मिचेल मार्शसमोर भन्नाट सेलिब्रेशन!
7
उद्धव ठाकरेंचा मराठवाड्यात ४ दिवस "दगाबाज रे" संवाद दौरा, शेतकऱ्यांशी साधणार संवाद
8
'ट्रॅजेडी क्वीन' मीना कुमारीवर बायोपिक येणार, क्रिती सेननचा पत्ता कट; 'ही' अभिनेत्री फायनल?
9
भाग्यवान! ११ वर्षांच्या मुलाचं अचानक 'असं' फळफळलं नशीब, रातोरात झाला करोडपती
10
डोक्यात रॉड मारून मोठ्या भावाची हत्या, मग गर्भवती वहिनीवर बलात्कार, नंतर तिलाही संपवलं...
11
अग्नितांडव! मेक्सिकोच्या सुपरमार्केटमध्ये भीषण आग; लहान मुलांसह २३ जणांचा मृत्यू
12
५,८०० कोटींच्या २००० रुपयांच्या नोटा अजूनही लोकांकडे पडून! अजूनही बदलण्याची संधी
13
सोमवारी प्रदोष व्रत २०२५: महादेव पूजनासह ‘या’ ७ गोष्टी आवर्जून करा; काही कमी पडणार नाही!
14
तिरुपतीच्या धर्तीवर पंढरपुरात होणार दर्शन मंडप; वारकऱ्यांना मिळणार कमी वेळेत विठ्ठलाचे दर्शन
15
सोमवारी प्रदोष व्रत २०२५: केवळ लाभ होईल, नशीब साथ देईल; प्रभावी शिव मंत्रांचा नक्की जप करा!
16
King Title Reveal: वाढदिवशी शाहरुखचं चाहत्यांना सरप्राईज! 'किंग'चा पहिला प्रोमो रिलीज, व्हिडीओ बघाच
17
Manoj Tiwari : "शिवीगाळ केली, वाहनांवर हल्ला"; मनोज तिवारींच्या रोड शोमध्ये प्रचंड गोंधळ, RJD वर गंभीर आरोप
18
"ख्रिश्चनांचं हत्याकांड थांबवलं गेलं नाही तर...!"; डोनाल्ड ट्रम्प यांची आता ‘या’ देशाला थेट हल्ल्याची धमकी
19
"लेकाच्या कठीण प्रसंगी देश विरोधात असताना...", शाहरुखबद्दल हिमानी शिवपुरी काय म्हणाल्या?
20
९ वर्षांच्या मुलीने मारली चौथ्या मजल्यावरून उडी, शाळेने पुरावे केले नष्ट; धक्कादायक Video

Kolhapur Politics: 'स्वाभिमानी' लोकसभा स्वतंत्र लढविणार, राजू शेट्टींनी फोडला प्रचाराचा नारळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 15, 2024 13:11 IST

सत्ताधारी व विरोधकांचे हात बरबटलेले

इचलकरंजी : सत्ताधारी आणि विरोधी या दोघांचेही हात बरबटलेले आहेत. त्यामुळे स्वाभिमानी पक्ष मतदारांसमोर स्वतंत्रपणे जाणार आहे. मतदारांना जे करायचे आहे, ते करतील, असे मत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते तथा माजी खासदार राजू शेट्टी यांनी व्यक्त केले. स्वाभिमानी पक्षाने लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराचा नारळ यानिमित्ताने फोडला.मकर संक्रांतनिमित्त स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने आयोजित हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील कार्यकर्त्यांचा स्नेहमेळावा वेदभवनमध्ये झाला. त्यावेळी ते बोलत होते. शेट्टी म्हणाले, सगळे जण स्वार्थासाठी पक्ष सोडून या पक्षातून त्या पक्षात जात आहेत. निकाल देतानाही चुकीच्या पद्धतीने दिला जात आहे. हेही पात्र आणि तेही पात्र, मग मतदार अपात्र आहेत का, असा प्रश्न पडतो. व्यवस्था पूर्णपणे बरबटलेली आहे. त्याला स्वच्छ करण्यासाठी मैदानात उतरणार आहे. सरकारचे धोरण महागाई यावर आवाज उठविण्याची कुणाची ताकद नाही. मीच त्यावर आवाज उठवू शकतो.निवडणुकीकडे आता गांभीर्याने बघण्याची वेळ आली आहे. मी सभागृहात नसल्याची जाणीव आता होत आहे. केंद्र सरकारला प्रश्न विचारणाऱ्यांचे रेकॉर्ड चांगले असले पाहिजे. जे ईडीला घाबरत नाहीत, तेच प्रश्न विचारू शकतात, ती धमक माझ्यात आहे. तुटलेल्या उसाचे पैसे मागत असताना खुळ्यात काढण्याचा प्रयत्न झाला. मात्र, आपण ही रक्कम वसूल करून दाखवली. ते फक्त स्वाभिमानीच करू शकते. आंदोलनामुळे शेतकऱ्यांच्या हातात एक हजार कोटी रुपये पडले. ३७ कुटुंबांकडून रक्कम काढून घेऊन ती १५ लाख कुटुंबांना वाटण्यात आली. शेतकऱ्यांना पैसे मिळाल्यामुळे ती रक्कम बाजारात आली आणि त्याचा सर्वच घटकांना फायदा झाला.जालंदर पाटील म्हणाले, सर्वप्रथम प्रचाराचा प्रारंभ करणारा स्वाभिमानी हा राज्यातील एकमेव पक्ष असेल. कार्यकर्त्यांनी गाफील न राहता रणनीती आखली पाहिजे. पुरोगामीचा विचार असणारा कोल्हापूर जिल्हा शेट्टींना तिसऱ्यांदा खासदार करेल. सावकार मादनाईक म्हणाले, मकर संक्रांतीचे औचित्य साधून रविवारी प्रचाराचा नारळ फुटत आहे. शरद पवारांची भेट घेतली म्हणजे त्यांच्यासोबत गेलो, असे नाही. स्वतंत्रपणे खासदारकीची निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे. कार्यकर्त्यांनी आता जोमाने कामाला लागावे.स्नेहमेळाव्यात रक्तदान शिबिर घेण्यात आले. विकास चौगुले, गोवर्धन दबडे, आप्पा ऐडके, सागर संभूशेटे आदींची भाषणे झाली. अण्णासाहेब शहापुरे यांनी प्रास्ताविक केले. यावेळी जनार्दन पाटील, जयकुमार कोले, सतीश मगदूम, हेमंत वणकुंद्रे, बाळगोंड पाटील, स्वस्तिक पाटील, बसगोंडा बिरादार, पुरंदर पाटील, विठ्ठल मोरे आदी उपस्थित होते.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरlok sabhaलोकसभाRaju Shettyराजू शेट्टीSwabimani Shetkari Sanghatnaस्वाभिमानी शेतकरी संघटना