शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
2
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
3
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
4
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
5
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
6
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
7
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
8
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
9
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
10
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
11
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
12
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
13
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
14
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
15
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
16
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
17
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
18
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
19
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
20
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur: कागल विधानसभा मतदारसंघात तिरंगी लढत होणार, ‘स्वाभिमानी’ रिंगणात उतरणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 9, 2024 15:15 IST

ते साखर सम्राट मागे का?

म्हाकवे : शेतकरी आणि सर्वसामान्यांच्या प्रश्नांची जाण असणाऱ्या प्रतिनिधींची गरज आहे. विधानसभेत आपल्या हक्काचा प्रतिनिधी हवा. यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी मागे न राहता कागलविधानसभा लढविण्यासाठी सज्ज व्हावे. यासाठी संपूर्ण ताकद आपल्या उमेदवाराच्या पाठीशी लावू, असा विश्वास शेतकरी संघटनेचे नेते माजी खासदार राजू शेट्टी यांनी व्यक्त केला.गोरंबे (ता. कागल) येथील कागल तालुका स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांच्या बैठकीत ते बोलत होते. तालुकाध्यक्ष बाळासाहेब पाटील यांनी प्रास्ताविक केले. यावेळी सोयाबीन पीक तालुक्यात प्रथम क्रमांक आलेल्या सुधीर पाटील (म्हाकवे) यांचा शेट्टी यांच्या हस्ते सत्कार झाला. तानाजी मगदूम, अविनाश मगदूम, संभाजी यादव, नामदेव भराडे यांनी मनोगते व्यक्त केली.यावेळी तानाजी चौगुले, सुभाष खोंद्रे (एकोंडी), मारुती मगदूम, अजित पाटील (सिद्धनेर्ली) प्रमोद मगदूम, दीपक हेगडे (सांगाव), शिवाजी कासोटे, मनोज परीट (शेंडूर), सुधाकर चौगुले (म्हाकवे) उपस्थित होते. पांडुरंग अडसूळ यांनी आभार मानले.ते साखर सम्राट मागे का?कागलच्या रणांगणात अनेक जण शड्डू ठोकत असून यामध्ये काही साखर सम्राटही आहेत. मात्र, त्यांनी मागील हंगामातील जिल्हाधिकारी यांच्या समक्ष झालेल्या निर्णयानुसार ५० व १०० रुपयांचा दुसरा हप्ता अद्यापही दिलेला नाही. निवडणुकीच्या रिंगणात पुढे असताना ते ठरलेला हप्ता देण्यात मागे का? असा सवालही शेट्टी यांनी केला.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरkagal-acकागलvidhan sabhaविधानसभाSwabimani Shetkari Sanghatnaस्वाभिमानी शेतकरी संघटनाRaju Shettyराजू शेट्टी