स्वाभिमानी अॅग्रो संस्थेचा निवडणूक कार्यक्रम जाहीर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 05:21 IST2021-01-08T05:21:58+5:302021-01-08T05:21:58+5:30
जयसिंगपूर : उदगाव (ता. शिरोळ) येथील स्वाभिमानी मल्टिस्टेट को-ऑपरेटिव्ह मिल्क ॲण्ड अॅग्रो प्रोसेसिंग लिमिटेड या संस्थेच्या पंचवार्षिक निवडणुकीचा कार्यक्रम ...

स्वाभिमानी अॅग्रो संस्थेचा निवडणूक कार्यक्रम जाहीर
जयसिंगपूर : उदगाव (ता. शिरोळ) येथील स्वाभिमानी मल्टिस्टेट को-ऑपरेटिव्ह मिल्क ॲण्ड अॅग्रो प्रोसेसिंग लिमिटेड या संस्थेच्या पंचवार्षिक निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. २२ फेब्रुवारीला मतदान होणार आहे. ११ जणांचे संचालक मंडळ असून १०८ सभासद संख्या आहे. या संस्थेच्या संचालक मंडळाच्या निवडीसाठी पंचवार्षिक निवडणुकीचा कार्यक्रम मंगळवारी जाहीर झाला. मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आली असून त्यावर हरकतींसाठी १३ जानेवारीपर्यंत मुदत आहे. १४ जानेवारीला हरकतीवर सुनावणी आणि १५ जानेवारीला अंतिम मतदार यादी प्रसिद्ध होणार आहे. १६ ते २२ जानेवारीदरम्यान नामनिर्देशनपत्र दाखल करणे, २५ जानेवारीला त्यावर हरकती नोंदविण्याचा कालावधी आहे. २७ जानेवारीला छाननी होणार असून २८ ला अंतिम उमेदवारांची यादी प्रसिद्ध होणार आहे. २९ जानेवारी ते ७ फेब्रुवारीअखेर माघार, तर ८ फेब्रुवारीला अंतिम उमेदवारांची यादी प्रसिद्ध होणार आहे. २२ फेब्रुवारी रोजी मतदान होणार असून २३ ला निकाल घोषित होईल.