घर सर्वेक्षणात ११३६ नागरिकांची स्वॅब तपासणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 19, 2021 04:16 IST2021-06-19T04:16:50+5:302021-06-19T04:16:50+5:30
कोल्हापूर : कोल्हापूर शहरात सुरु असलेल्या कोरोना आजाराच्या पार्श्वभूमीवर महानगरपालिकेच्या आरोग्य विभागामार्फत शुक्रवारी अकरा नागरी आरोग्य केंद्रामार्फत १६२९ घरांचे ...

घर सर्वेक्षणात ११३६ नागरिकांची स्वॅब तपासणी
कोल्हापूर : कोल्हापूर शहरात सुरु असलेल्या कोरोना आजाराच्या पार्श्वभूमीवर महानगरपालिकेच्या आरोग्य विभागामार्फत शुक्रवारी अकरा नागरी आरोग्य केंद्रामार्फत १६२९ घरांचे सर्वेक्षण करण्यात आले. यामध्ये ६२२३ नागरिकांची तपासणी करण्यात आली. तर ११३६ नागरिकांचे स्वॅब घेण्यात आले.
महानगरपालिका प्रशासनामार्फत कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजना शहरात राबविण्यात येत आहेत. नागरी आरोग्य केंद्रातील कर्मचारी घराघरात जाऊन नागरिकांची आरोग्य तपासणी करत आहेत. साथ आटोक्यात आणण्यास हे सर्वेक्षण उपयुक्त ठरत आहे. या सर्वेक्षणात नागरिकांची तपासणी करणे,कोणती लक्षणे असतील तर त्यांचे स्वॅब घेण्याचे काम सुरु आहे. जर कोणी पॉझिटिव्ह आला तर त्यांना रुग्णालयात दाखल केले जात आहे.
शुक्रवारी नेहरु नगर, जवाहर नगर, एस. एस. सी. बोर्ड, सुभाष बोर्ड, देशपांडे गल्ली, बिनखांबी गणेश मंदिर, वांगी बोळ, महाद्वार रोड, राजारामपुरी, प्रतिभानगर, दौलतनगर, शाहूनगर, यादवनगर, शाहूपुरी, प्रथमेश नगर, आपटेनगर, म्हाडा कॉलनी, रायगड कॉलनी, नाईकनवरे नगर, विक्रमनगर, टेंबलाईवाडी, रुईकर कॉलनी या ठिकाणी घरोघरी जाऊन सर्वेक्षण करण्यात आले.