प्राध्यापकांना पदोन्नतीचे लाभ मिळवून देण्यात ‘सुटा’ची मोठी भूमिका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 05:02 IST2021-01-13T05:02:42+5:302021-01-13T05:02:42+5:30
कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठ शिक्षक संघाने (सुटा) प्राध्यापकांचे हक्क, प्रश्नांसाठी सातत्याने आवाज उठविला आहे. प्राध्यापकांना पदोन्नतीचे लाभ मिळवून देण्यात ...

प्राध्यापकांना पदोन्नतीचे लाभ मिळवून देण्यात ‘सुटा’ची मोठी भूमिका
कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठ शिक्षक संघाने (सुटा) प्राध्यापकांचे हक्क, प्रश्नांसाठी सातत्याने आवाज उठविला आहे. प्राध्यापकांना पदोन्नतीचे लाभ मिळवून देण्यात ‘सुटा’ची मोठी भूमिका आहे, असे प्रतिपादन कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के यांनी रविवारी येथे केले.
विद्यापीठाने महाविद्यालयीन शिक्षकांची प्राध्यापकपदावर पदोन्नतीने स्थाननिश्चिती करण्यासाठी प्रस्ताव मागविले आहेत. याबाबत प्राध्यापकांना मार्गदर्शन करण्यासाठी सुटाने विद्यापीठाच्या भौतिकशास्त्र अधिविभागाच्या सभागृहात सावित्रीबाई फुले जयंतीदिनी आयोजित कार्यशाळेच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. प्राध्यापकपदासाठी स्थाननिश्चितीचे प्रस्ताव कसे तयार करावेत, याबाबत मार्गदर्शन करण्याचा सुटाचा प्रयत्न स्तुत्य आहे. त्यामुळे पदोन्नतीच्या निकषांचे नेमके आकलन होईल, असे डॉ. शिर्के यांनी सांगितले. आंतरराष्ट्रीय संशोधन पत्रिकांमध्ये शोधनिबंधाचे प्रकाशन कसे करावे. इम्पॅक्ट फॅक्टर, सायटेशन इंडेक्स, आदींबाबत प्र-कुलगुरू डॉ. पी. एस. पाटील यांनी मार्गदर्शन केले. सुटाचे अध्यक्ष प्रा. आर. के. चव्हाण यांनी प्रास्ताविक केले. विश्वस्त प्रा. एस. जी. पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. अरुण शिंदे यांनी सूत्रसंचालन केले. यावेळी सुधाकर मानकर, डी. एन. पाटील, इला जोगी, अरुण पाटील, डी. आर. भोसले, वैशाली सारंग, सुनीता अमृतसागर, सयाजी पाटील, नीलेश जाधव, आबासाहेब चौगुले, राहुल मांडणीकर आदी उपस्थित होते.
चौकट
कार्यशाळेत यांचे मार्गदर्शन
कार्यशाळेत प्रा. डॉ. आर. जी. कोरबू, प्रकाश कुंभार, सुनील सावंत यांनी स्थाननिश्चिती, पदोन्नतीबाबतच्या विविध विषयांवर मार्गदर्शन केले.
फोटो (१००१२०२१-कोल-सुटा कार्यशाळा) : शिवाजी विद्यापीठ शिक्षक संघातर्फे रविवारी आयोजित कार्यशाळेच्या उदघाटनप्रसंगी कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के यांनी मार्गदर्शन केले. यावेळी डावीकडून सुनील सावंत, एस. जी. पाटील, एस. पी. पाटील, सुधाकर मानकर, प्रकाश कुंभार, आर.जी. कोरबू, आर. के. चव्हाण उपस्थित होते.