शिक्षण सहसंचालकांविरोधात ‘सुटा’चे आंदोलन सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 22, 2020 04:23 IST2020-12-22T04:23:09+5:302020-12-22T04:23:09+5:30
या कार्यालय परिसरात दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास ‘सुटा’चे पदाधिकारी, सभासद प्राध्यापक जमले. त्यांनी मागण्यांच्या अनुषंगाने घोषणा देत परिसर दणाणून ...

शिक्षण सहसंचालकांविरोधात ‘सुटा’चे आंदोलन सुरू
या कार्यालय परिसरात दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास ‘सुटा’चे पदाधिकारी, सभासद प्राध्यापक जमले. त्यांनी मागण्यांच्या अनुषंगाने घोषणा देत परिसर दणाणून सोडला. यावेळी झालेल्या सभेत ‘सुटा’चे प्रमुख कार्यवाह डॉ. डी. एन. पाटील यांनी मार्गदर्शन केले. शिक्षण सहसंचालक उबाळे यांच्या भ्रष्ट आणि मनमानी कारभाराविरोधात ‘सुटा’ने धरणे आंदोलन केले आहे. ते प्राध्यापकांची अडवणूक करत आहेत. नियमांनुसार असणारी कामेसुद्धा अडवली जात आहे. त्यांनी आमच्या मागण्या कालबद्ध पद्धतीने निर्गत करावी, अन्यथा आंदोलन तीव्र केले जाईल, असा इशारा डॉ. पाटील यांनी यावेळी दिला. या आंदोलनात प्रा. अरुण पाटील, आर. के. चव्हाण, डी. आर. भोसले, यु. ए. वाघमारे, एस. एम. मोहोळकर, आर. जी. कोरबू, प्रकाश कुंभार, संतोष जेटीथोर, आदींसह शिवाजी विद्यापीठ कार्यक्षेत्रातील सुमारे १५० प्राध्यापक सहभागी झाले. ‘सुटा’च्या शिष्टमंडळाने शिक्षण सहसंचालक उबाळे यांना विविध मागण्यांचे आंदोलन दिले. त्यावर त्यांनी स्थान निश्चिती आणि वेतन निश्चिती प्रलंबित प्रकरणे ३० डिसेंबरपर्यंत मार्गी लावली जातील. ‘सुटा’समवेत चर्चा केली जाईल, असे सांगितले असल्याचे डॉ. पाटील यांनी सांगितले.
काही मागण्या अशा
प्राध्यापकांच्या स्थान निश्चितीची प्रलंबित प्रकरणे तातडीने निर्गत करावीत.
सातव्या वेतन आयोगाच्या वेतन निश्चितीची प्रलंबित प्रकरणे तातडीने निर्गत करावीत.
सहाव्या वेतन आयोगानुसार पीएच.डी., एम. फीलधारकांना वेतनवाढी लागू कराव्यात.
विभागीय सहसंचालक कार्यालयात वर्षानुवर्षे ठाण मांडून बसलेल्या कर्मचाऱ्यांच्या तत्काळ बदल्या कराव्यात.
फोटो (२११२२०२०-कोल-सुटा आंदोलन) : विविध प्रलंबित मागण्यांसाठी कोल्हापुरात सोमवारी शिवाजी विद्यापीठ शिक्षक संघाच्या पदाधिकारी, सभासदांनी उच्चशिक्षण सहसंचालक कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले.