शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
3
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
4
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
5
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
6
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
7
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
8
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
9
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
10
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
11
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
12
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
13
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
14
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
15
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
16
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
17
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
18
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
19
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
20
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur: खेड पोलिस कोठडीतील आरोपीचा संशयास्पद मृत्यू, नातेवाईकांचा सीपीआरमध्ये गोंधळ

By उद्धव गोडसे | Updated: January 25, 2024 12:29 IST

पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी, पोलिस बंदोबस्तात शवविच्छेदन

कोल्हापूर : सोने, चांदी पॉलिश करून फसवणूक करणाऱ्या पाच जणांच्या टोळीतील एका संशयिताचा मंगळवारी (दि. २३) उपचारादरम्यान रत्नागिरी जिल्ह्यातील कळंबणी उपजिल्हा रुग्णालयात मृत्यू झाला. मोहंमद सुबेर इम्रान शेख (वय २८, रा. तुलसीपूर जमुनिया, जि. भागलपूर, बिहार) असे मृत संशयिताचे नाव आहे. कोल्हापुरातील छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालय म्हणजे सीपीआरमध्ये शवविच्छेदन करताना गुरुवारी (दि. २५) सकाळी मृताच्या नातेवाईकांनी गोंधळ घालत, खेड पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. यामुळे परिसरात काही काळ तणाव निर्माण झाला होता. अखेर पोलिस बंदोबस्तात शवविच्छेदन करण्यात आले.दागिने पॉलिश करून देतो, असे सांगून महिलेला बेशुद्ध करून दागिने लुटल्याचा प्रकार ८ जानेवारीला खेडमध्ये घडला होता. या घटनेत ४ लाख ८० हजार इतक्या किमतीच्या ४ सोन्याच्या बांगड्या व २ सोन्याच्या पाटल्या घेऊन आरोपी पळून गेले होते. या प्रकरणाचा तपास करताना पोलिसांनी २१ जानेवारीला नाशिक येथून एका टोळीतील पाच जणांना ताब्यात घेतले होते.यात मोहंमद सुबेर इम्रान शेख (वय २८) याच्यासह साजिद लाडू साह (२४), मोहंमद आबिद इल्यास शेख (२९), महंमद जुबेर फती आलम शेख (३२, सर्व रा. तुलसीपूर जमुनिया, जिल्हा भागलपूर, राज्य बिहार) तसेच नंदकुमार श्रीरंग माने (५०, रा. मनमाड शिवाजी चौक, ता. नांदगाव, जि. नाशिक) यांची पोलिस कोठडीत रवानगी झाली होती.या टोळीने महाराष्ट्रातील ८ जिल्ह्यात एकूण २१ महिलांची अशाप्रकारे फसवणूक केल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यामध्ये नाशिक, पुणे, रत्नागिरी, सिंधुदुर्ग कोल्हापूर, सातारा, अहमदनगर, जालना व संभाजीनगर या जिल्ह्यांचा समावेश आहे. खेडचे पोलिस निरीक्षक नितीन भोयर हे आपल्या पथकासह या गुन्ह्याचा तपास करत होते. कोठडीदरम्यान पोलिसांकडून झालेल्या मारहाणीमुळे शेख याला रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. यातच त्याचा मृत्यू झाल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे. शवविच्छेदन करण्यापूर्वी खेड पोलिसांवर गुन्हा दाखल करावा, अन्यथा मृतदेह स्वीकारणार नाही, अशी भूमिका घेऊन नातेवाईकांनी सीपीआरच्या अपघात विभागासमोर गोंधळ घातला. हा प्रकार लक्षात येताच लक्ष्मीपुरी पोलिस ठाण्याचे निरीक्षक अविनाश कवठेकर, सीआयडीच्या निरीक्षक वैष्णवी पाटील, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे निरीक्षक रवींद्र कळमकर यांनी सीपीआरमध्ये धाव घेऊन मृताच्या नातेवाईकांशी चर्चा केली. परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी पोलिसांसह शीघ्र कृती दलाची एक तुकडी सीपीआरमध्ये तैनात केली होती. 

टॅग्स :kolhapurकोल्हापूरRatnagiriरत्नागिरीPoliceपोलिस