मार्केट यार्डमध्ये हमालाचा संशयास्पद मृत्यू

By Admin | Updated: March 1, 2015 00:37 IST2015-03-01T00:32:42+5:302015-03-01T00:37:46+5:30

डोक्यात गंभीर जखम

Suspicious death of humana in the market yard | मार्केट यार्डमध्ये हमालाचा संशयास्पद मृत्यू

मार्केट यार्डमध्ये हमालाचा संशयास्पद मृत्यू

कोल्हापूर : मार्केट यार्ड येथे शनिवारी सकाळी सातच्या सुमारास भाजी मार्केट गाळा क्र. ३ च्या समोर अज्ञात ५० वर्षांच्या हमालाचा मृतदेह आढळून आला. त्याच्या डोक्यात गंभीर जखम दिसून आल्याने खून की नैसर्गिक मृत्यू याबाबत पोलीस संभ्रमावस्थेत असून त्याची ओळख पटविण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते.
याबाबत पोलिसांनी सांगितले, भाजी मार्केटमधील तीन नंबरच्या गाळ्यासमोर हमाल मृतावस्थेत पडलेला येथील सुरक्षारक्षकांना दिसला. त्यांनी याबाबत शाहूपुरी पोलिसांना वर्दी दिली. पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली असता त्याच्या डोक्यात जखमेचा व्रण दिसून आला. शवविच्छेदन अहवालामध्ये डोक्याला गंभीर जखम होऊन अतिरक्तस्रावाने त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. पोलिसांनी हमालाबाबत चौकशी केली असता त्याची रात्री उशिरापर्यंत ओळख पटली नव्हती. तो भाजीपाला हमालीचे काम करीत असे, त्याचे नाव किंवा पत्ता माहिती नसल्याचे येथील नागरिकांनी सांगितले.

Web Title: Suspicious death of humana in the market yard