बेवारसाचा खून झाल्याचा संशय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 8, 2021 04:17 IST2021-07-08T04:17:46+5:302021-07-08T04:17:46+5:30

कोल्हापूर : शिंगणापूर- हणमंतवाडी या नदीकाठच्या रस्त्यावर सापडलेल्या अनोळखी व्यक्तीच्या मृतदेहाची ओळख पटवण्याचे काम सुरू आहे. त्याच्या डोक्याला गंभीर ...

Suspicion of unscrupulous murder | बेवारसाचा खून झाल्याचा संशय

बेवारसाचा खून झाल्याचा संशय

कोल्हापूर : शिंगणापूर- हणमंतवाडी या नदीकाठच्या रस्त्यावर सापडलेल्या अनोळखी व्यक्तीच्या मृतदेहाची ओळख पटवण्याचे काम सुरू आहे. त्याच्या डोक्याला गंभीर जखमा आढळल्याने खुनाच्या अनुषंगाने तपास सुरू केला असल्याचे पोलीस निरीक्षक संदीप कोळेकर यांनी सांगितले.

शिंगणापूर ते हणमंतवाडी रस्त्यावर मंगळवारी सायंकाळी अनोळखी पुरुषाचा मृतदेह नागरिकांच्या निदर्शनास आला. त्यांनी माहिती करवीर पोलिसांना दिली. घटनास्थळी पोलिसांनी पहाणी केली. ४० ते ४५ वयोगटातील एक पुरुष व्यक्ती मृतावस्थेत त्यांना मिळून आली. त्याच्या डोक्यात गंभीर दुखापत होती. त्यामुळे हा घातपात असावा असा संशय पोलिसांना आला. त्यानुसार बुधवारी खुनाचा गुन्हा नोंद करून त्या अनुषंगाने तपासास सुरुवात केली. मृतव्यक्तीने अंगात निळ्या रंगाचा शर्ट व पांढऱ्या रंगाची फूल पॅन्ट परिधान केली आहे.

Web Title: Suspicion of unscrupulous murder