सोलापूरच्या तरुणाच्या खुनाचा संशय, दोघे संशयित ताब्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2021 04:41 IST2021-05-05T04:41:33+5:302021-05-05T04:41:33+5:30

इचलकरंजी (जि. कोल्हापूर) : आमराई रोड परिसरातील विहिरीमध्ये सापडलेल्या तरुणाचा खून करण्यात आल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला. त्या मृतदेहाची ...

Suspicion of murder of Solapur youth, two suspects in custody | सोलापूरच्या तरुणाच्या खुनाचा संशय, दोघे संशयित ताब्यात

सोलापूरच्या तरुणाच्या खुनाचा संशय, दोघे संशयित ताब्यात

इचलकरंजी (जि. कोल्हापूर) : आमराई रोड परिसरातील विहिरीमध्ये सापडलेल्या तरुणाचा खून करण्यात आल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला. त्या मृतदेहाची ओळख पटली असून, किशोर ऊर्फ आकाश महालिंग भोसले (वय ३५, मूळ रा. सोलापूर, सध्या रा. सहकारनगर, इचलकरंजी) असे त्याचे नाव आहे. याप्रकरणी दोघा संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून, त्यांच्याकडे कसून चौकशी सुरू आहे.

किशोर हा सहकारनगरमध्ये एका पत्र्याच्या शेडमध्ये राहत होता. मिळेल ते काम करून तो आपला चरितार्थ चालवत होता. त्याला दारूचे व्यसन होते. कौटुंबिक वादातून त्याची पत्नी माहेरी गेल्याने काही वर्षे तो एकटाच राहत होता.

दरम्यान, देवमोरे यांच्या विहिरीत एक मृतदेह तरंगताना आढळल्याने सोमवारी (दि. ३) पोलिसांनी तो ताब्यात घेतला होता. किशोर याच्या मावस बहिणीने हा मृतदेह ओळखला. घटनास्थळी एका लोखंडी खांबावर रक्ताचे डाग आढळले आहेत. त्यामुळे किशोर याला त्या खांबावर बडवून तसेच त्याच्या डोक्यात जबर मारहाण करून त्याचा खून केला असल्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. त्यानुसार गावभाग व स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने शोधमोहीम राबवून दोघा संशयितांना ताब्यात घेतले आहे. त्यांच्याकडे रात्री उशिरापर्यंत कसून चौकशी सुरू होती. हा खून आर्थिक देवाण-घेवाणीतून झाला असल्याची चर्चा सुरू आहे.

Web Title: Suspicion of murder of Solapur youth, two suspects in custody

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.