किणीतील युवकांचा अपघाती नव्हे तर घातपाताचा संशय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2021 04:29 IST2021-09-09T04:29:49+5:302021-09-09T04:29:49+5:30

विपुल उदय आळतेकर (वय २१, रा. किणी) असे मृताचे नाव आहे. हा अपघात बुधवारी रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास अंबप ...

Suspicion of an accident, not an accident | किणीतील युवकांचा अपघाती नव्हे तर घातपाताचा संशय

किणीतील युवकांचा अपघाती नव्हे तर घातपाताचा संशय

विपुल उदय आळतेकर (वय २१, रा. किणी) असे मृताचे नाव आहे. हा अपघात बुधवारी रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास अंबप फाट्यानजीक झाला होता. त्यात दुचाकीवर मागे बसलेल्या आशिष राजेंद्र धनवडे हा किरकोळ जखमी झाला होता. आळतेकर यांच्यावर उपचार सुरू असताना,गुरुवारी (दि. २) मृत्यू झाला.या मृत्यूबाबत संशयास्पद व विसंगत घटनाक्रम याबाबत संशय व्यक्त करून चौकशीची मागणी केली आहे.

निवेदन व पोलिसातून मिळालेल्या माहितीनुसार : आळतेकर व धनवडे हे मोटारसायकलवरून कोल्हापूर हून किणीकडे परत येत होते. अंबप फाट्यानजिक असलेल्या हातकणंगले सूतगिरणीजवळ त्यांचा अपघात झाला होता. यामध्ये आळतेकर हा गंभीर जखमी झाला होता. त्याला मदत करण्याऐवजी धनवडे पलायन करून किरकोळ जखमी असताना उपचारासाठी गेला तसेच मोटरसायकल पोलिसांनी ताब्यात घेतलेली नाही, त्यावर नातेवाईकांचा आक्षेप घेण्यात आला आहे. याबाबत बौद्ध समाज, रिपाइं आठवले गट यांच्यावतीने निवेदन पोलीस निरीक्षक संतोष घोळवे यांना देण्यात आले.यावेळी त्यांनी मृतदेहाच्या उत्तरीय तपासणी अहवाल आल्यानंतर वस्तुस्थिती समजेल. या घटनेची सखोल चौकशी करून कारवाई केली जाईल. दोषीना पाठीशी घालणार नाही, अशी ग्वाही त्यांनी शिष्टमंडळाला दिली. यावेळी जिल्हा परिषद सदस्या पुष्पाताई आळतेकर, निर्मला धनवडे, शारदा धनवडे, प्रदीप धनवडे, अमर धनवडे, राकेश कुरणे, सुशांत कांबळे, अर्जुन धनवडे आदी उपस्थित होते.

Web Title: Suspicion of an accident, not an accident

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.