शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
2
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
3
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
4
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
5
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
6
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
7
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
8
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
9
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
10
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
11
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
12
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
13
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
14
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
15
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
16
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
17
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
18
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
19
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
20
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
Daily Top 2Weekly Top 5

पैसे घेतानाचा व्हिडीओ समोर येताच निलंबन, कोल्हापूर जिल्हा परिषदेत खळबळ 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 2, 2025 14:29 IST

एकाच दिवशी ‘बांधकाम’चा शिपाई तांदळे, ग्रामसेवक सूर्यवंशी, औषध निर्माण अधिकारी बिल्ले निलंबित झाल्याने खळबळ

कोल्हापूर : पंधरा दिवसांच्या रजेवर जाणारे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस. यांनी बुधवारी तब्बल तिघांचे निलंबन करून कारवाईचा दणका दिला. कहर म्हणजे बांधकाम खात्याचा शिपाई विजय आनंदा तांदळे अधिकाऱ्यांच्या दालनाबाहेर पैसे मोजत असतानाचा व्हिडीओ थेट कार्तिकेयन यांनाच पाठविण्यात आल्याने त्याला तडकाफडकी निलंबित करण्यात आले.

तर पणुत्रे ता. शाहूवाडीचा ग्रामसेवक शांतीनाथ सूर्यवंशी आणि औषध निर्माण अधिकारी युवराज बिल्ले यालाही निलंबनाचा तडाखा देण्यात आला. रात्री आठच्या सुमारास काढण्यात आलेल्या या निलंबन आदेशामुळे जिल्हा परिषदेत खळबळ उडाली आहे.

बांधकाम विभागातील खाबूगिरीचे एक एक किस्से समोर येत असताना मंगळवारी संध्याकाळी कार्तिकेयन यांना एक व्हिडीओ आला. त्यामुळे कार्यकारी अभियंत्यांच्या दालनाबाहेर तांदळे नोटा मोजत होता. यावेळी काही ठेकेदारही तिथे उपस्थित होते. आधीच बांधकामच्या कारभारावर तीव्र नाराज असलेल्या कार्तिकेयन यांनी बुधवारीच प्रक्रिया पूर्ण करून त्याला निलंबित करून टाकले. जयसिंगपूर प्राथमिक आरोग्य केंद्राकडे त्याने रोज उपस्थित राहायचे आहे.शाहूवाडी तालुक्यातील पणुत्रे येथील गायरानासह वनखात्याच्या हद्दीतील तोड चर्चेत आली होती. येथील ग्रामसेवक शांतीनाथ सूर्यवंशी यांनी एकीकडे मूल्यांकन कमी केले. शिवाय ठेकेदाराने परवानगीपेक्षा जास्त झाडे तोडली. या सर्व प्रक्रियेत सूर्यवंशी यांनी दुर्लक्ष करून शासनाचे नुकसान केल्याचा ठपका ठेवत त्यांना निलंबित करण्यात आले असून त्यांचे मुख्यालय आजरा ठेवण्यात आले आहे.

तिसऱ्या प्रकरणात मुख्य औषध निर्माण अधिकारी युवराज बिल्ले यांना निलंबित करण्यात आले आहे. कोविड काळात औषध वितरणात अनियमितता, ठेकेदारांची सुरक्षा ठेव वेळेत न देणे, दप्तर अद्ययावत न ठेवणे, औषध वितरणातील अनियमिततेचा ठपका ठेवून त्यांना निलंबित करण्यात आले आहे. बिल्ले सध्या चंदगड तालुक्यातील अडकूर प्राथमिक आरोग्य केंद्राकडे कार्यरत आहेत. त्यांना शाहूवाडी पंचायत समितीमध्ये रोजची उपस्थिती बंधनकारक करण्यात आली आहे.

बांधकाम विभागाचा एक अधिकारी रडारवरबांधकाम विभागाचा टाक्यांची परस्पर विल्हेवाट करण्याच्या प्रकरणातील एक अधिकारी निलंबनासाठी रडारवर असल्याचे समजते. या अधिकाऱ्याच्या निलंबनासाठी फाईलही तयार करण्यात आली होती; परंतु त्यामध्ये काही त्रुटी होत्या. त्या दुरुस्त करण्यासाठी वरिष्ठ अधिकारी फाईल घेऊन गेले; परंतु नंतर त्यांचा संपर्कच होत नसल्याने सामान्य प्रशासन विभागाचे कर्मचारी वाट पाहून जिल्हा परिषदेतून निघून गेल्याचे सांगण्यात आले; परंतु बांधकाम विभागातील एक एक धक्कादायक बाबींमुळे लवकरच मोठी कारवाई होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

खिसा भरलेला शिपाई३१ मार्च दिवशी रात्री बांधकाम विभागाच्या एका शिपायाचा खिसा पैशाने भरलेला होता. कार्तिकेयन यांच्या ही बाब निदर्शनास आल्यानंतर त्यांनी त्याची बदली शाहूवाडी तालुक्यात केली आहे. एकाचा खिसा भरला होता आणि आता दुसरा शिपाई नोटा मोजतानाच सापडल्याने बांधकाम विभागातील कारभाराची पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरzpजिल्हा परिषद