दुसरी सून आणणारा फौजदार निलंबित

By Admin | Updated: April 30, 2017 00:14 IST2017-04-30T00:14:24+5:302017-04-30T00:14:24+5:30

कदम हे पदाचा दुरुपयोग करून अत्यंत गंभीर स्वरूपाचे गैरवर्तन करीत असल्याने त्यांना निलंबित करून

Suspending the military with the other | दुसरी सून आणणारा फौजदार निलंबित

दुसरी सून आणणारा फौजदार निलंबित

सातारा : मुलाचा दुसरा विवाह लावून फसवणूक केल्याचा ठपका ठेवून भुर्इंज पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले पोलीस उपनिरीक्षक गणेश शंकरराव कदम यांना जिल्हा पोलिस अधीक्षक संदीप पाटील यांनी निलंबित केले.
गणेश कदम हे भुर्इंज पोलीस ठाण्यात कार्यरत आहेत. त्यांना कायद्याचे चांगले ज्ञान असतानाही त्यांनी त्यांच्या मुलाचा दुसरा विवाह शीतल प्रतीक कदम यांच्याशी लावून त्यांची फसवणूक केली. शीतल कदम या सासरी नांदावयास आल्या असता त्यांचा शारीरिक व मानसिक छळ केला. शीतल कदम यांनी याबाबत पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असता पोलीस उपनिरीक्षक गणेश कदम यांनी तपासी अंमलदार यांच्यावर दबाव आणला. त्यामुळे पुढील कारवाई होत नसल्याचा तक्रार अर्ज शीतल कदम यांनी केला होता. गणेश कदम हे पदाचा दुरुपयोग करून अत्यंत गंभीर स्वरूपाचे गैरवर्तन करीत असल्याने त्यांना निलंबित करून त्यांची खातेनिहाय चौकशीचे आदेश पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांनी दिले आहेत. (प्रतिनिधी)

Web Title: Suspending the military with the other